जाहिरात
This Article is From Feb 24, 2026

Holi News: होळी दरम्यान प्रदोष काळ अन् चंद्रग्रहण ही!, मग सण नेमका कधी साजरा करायचा? वाचा सर्व डिटेल्स

अशा प्रकारची कर्मे करता येत असल्याने वेधकाळात धूलिवंदन (धुळवड), रंग खेळणे हे देखील करता येईल.

Holi News: होळी दरम्यान प्रदोष काळ अन् चंद्रग्रहण ही!, मग सण नेमका कधी साजरा करायचा? वाचा सर्व डिटेल्स
सोलापूर:

सौरभ वाघमारे 

होळीचा सण जवळ आला आहे. 2 मार्चला होळी तर 3 मार्चला धुलिवंदन आहे. होळीची तयारी सध्या सगळीकडे केली जात आहे. कोकणात ही त्याची खास तयारी सुरू झाली आहे. कोकणासाठी होळी हा सण तसा खास समजला जातो. मुंबईतून कोकणात होळीसाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. पण यावेळी होळी साजरी करताना काही गोष्टींकडे नक्की लक्ष द्यावे लागणार आहे. पंचागकर्ते मोहन दाते यांनी याबाबत काही माहिती दिली आहे.  

होळी दरम्यान प्रदोष काळ आणि चंद्रग्रहण आहे असं दाते यांनी सांगितलं आहे. त्यामुळे अशा स्थितीत  हा सण नेमका कधी साजरा करायचा या संदर्भात संभ्रण निर्माण झाला आहे. मात्र चंद्रग्रहण, प्रदोष कालावधी, स्थिती आणि सूर्यास्ताची वेळ पाहता 2 तारखेलाच होलिकादहन आणि 3 तारखेलाच धुलिवंदन साजरा करता येईल, अशी माहिती प्रसिद्ध पंचागकर्ते मोहन दाते यांनी दिली. 

नक्की वाचा - Trending News: ना थाटमाट ना बँड-बाजा! 2 IAS अधिकाऱ्यांच्या साध्या लग्नाची मोठी चर्चा

“या वर्षी 2 मार्च 2026 रोजी सोमवारी भद्रा असताना प्रदोष काळात होलिका दहन करावे. दुसऱ्या दिवशी  3 मार्च 2026 रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण असून मंगळवारी सूर्योदयापासून वेधकाळ सुरु होत आहे. वेधकाळात पौर्णिमेचा कुळधर्म, पूजा-अर्चा, अभिषेक करता येईल. देवाला नैवेद्य दाखविता येईल. वेधामध्ये पूजन निषेध नाही. आपणास भोजन निषेध असल्याने नैवेद्य अगदी थोडा करावा. अशा प्रकारची कर्मे करता येत असल्याने वेधकाळात धूलिवंदन (धुळवड), रंग खेळणे हे देखील करता येईल. असे त्यांनी स्पष्ट केले आहे.  

नक्की वाचा - Shocking news: एका रात्रीची बायको! नवरा- नवरीची पहिली रात्र त्याच वेळी बिंग फुटलं अन् थेट लग्नच मोडलं

अशी माहिती पंचागकर्ते मोहन दाते यांनी दिली. दरम्यान  आपल्या गावाच्या सूर्यास्तापासून 18:48 पर्यंत ग्रहणाचा पर्वकाल आहे. काही ठिकाणी अगदी थोडावेळ पर्वकाल असल्याने त्यांनी 18:48 नंतर फक्त मोक्षस्नान करावे. ज्यांना 15-20 मिनिटांपेक्षा अधिक पर्वकाळ मिळत आहे त्यांना सूर्यास्तानंतर स्नान करून थोडावेळ जप करून 18:48 नंतर मोक्षस्नान करता येईल.“ अशी माहिती पंचागकर्ते मोहन दाते यांनी दिली आहे. 

नक्की वाचा - Trending News: 28 वर्षांच्या मुस्लीम तरुणीने 32 वर्षाने मोठ्या हिंदू आजोबांसोबत केलं लग्न, फोटो होतोय Viral

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com