Pune News : ग्रामस्थांनी मृतदेह खाली ठेवून काढला पळ, स्मशानभूमीत भीतीचं वातावरण; पुण्यात अचानक काय घडलं?

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या सरहद्दीवरील वडगाव पीर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारादरम्यान धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अविनाश पवार, प्रतिनिधी

Pune News : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या सरहद्दीवरील वडगाव पीर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारादरम्यान धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. अचानक असं काही घडलं की, ग्रामस्थांनी मृतदेह खाली सोडून पळ काढला. सध्या ही घटना गावात चर्चेचा विषय ठरली आहे. अत्यंत संवेदनशील वेळी नेमकं काय घडलं?

स्मशानभूमीत भीतीचं वातावरण...

मिळालेल्या माहितीनुसार, अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू असतानाच स्मशानभूमी परिसरातील मधमाशांचे मोहोळ अचानक उठले आणि उपस्थितांवर तुटून पडले. मधमाशांच्या हल्ल्यामुळे स्मशानभूमीत भीतीचं वातावरण निर्माण झालं. उपस्थित नागरिकांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी धावाधाव करत घटनास्थळ सोडलं. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र, अनेकांना मधमाशांनी चावा घेतल्याने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मधमाशांच्या मोहोळाने अचानक हल्ला चढवल्याने एकच गोंधळ उडाला. या अनपेक्षित घटनेमुळे उपस्थित नागरिकांना मृतदेह काही काळ स्मशानभूमीतच ठेवून जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळ काढावा लागला.

Advertisement

नक्की वाचा -  2 इंटर्न ठेवले अन् काही दिवसात 12 लाख कमावले; पुण्याच्या तरुणाचा भन्नाट साइड बिझनेस

या घटनेमुळे काही काळ स्मशानभूमी परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर अंत्यसंस्काराची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली. अंत्यसंस्कारासारख्या अत्यंत संवेदनशील प्रसंगी घडलेल्या या घटनेची परिसरात जोरदार चर्चा असून स्मशानभूमी परिसरातील मधमाशांच्या मोहोळाबाबत योग्य उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.


Topics mentioned in this article