जाहिरात

Pune News : 2 इंटर्न ठेवले अन् काही दिवसात 12 लाख कमावले; पुण्याच्या तरुणाचा भन्नाट साइड बिझनेस

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करुन पुण्यातील एक चार्टर्ड अकाऊटेंट अवघ्या काही दिवसात लखपती झाला आहे

Pune News : 2 इंटर्न ठेवले अन् काही दिवसात 12 लाख कमावले; पुण्याच्या तरुणाचा भन्नाट साइड बिझनेस

Income Tax Return Side Income : इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करुन पुण्यातील एक चार्टर्ड अकाऊटेंट अवघ्या काही दिवसात लखपती झाला आहे आणि विशेष म्हणजे ही त्याची साइड इन्कम आहे. दोन इंटर्नच्या मदतीने त्याने ही कमाई केली आहे. ही व्यक्ती डिजिटल कंटेन्ट क्रिएटर परितोष शर्माचा मित्र आहे. त्याने तीन वर्षांपूर्वी हे काम सुरू केलं. ६० सेकंदात ब्रेन रॉट व्हिडिओ करणारे परितोषने सोशल मीडिया पोस्टमध्ये दावा केला आहे की, सद्यस्थितीत त्याच्या सीए मित्राकडे जवळपास ४०० क्लाइंट्स आहेत आणि तो प्रत्येक क्लाइंट्सकडून ३००० रुपये चार्ज करतो. 

फुल-टाइम नोकरीपेक्षा जास्त कमाई...

लाखो फॉलोअर्स असणारे परितोष यांचं म्हणणं आहे की, मित्राचं नेटवर्क जस जसं वाढतंय तसं तसं त्याच्याकडे अनेक क्लाइंट्स बिजनेस रजिस्ट्रेशन, अकाऊंटिंग आणि दुसऱ्या कामांसाठीही येत आहेत. यामुळेच आज तो फुल-टाइम नोकरीपेक्षा आपल्या प्रॅक्टिसमधून अधिक कमावत आहे. परितोषने एक्सवर आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, जेव्हा कोणत्याही स्किलसह विश्वास आणि मजबूत नेटवर्क जोडलं जातं, त्यातून चांगले पैसे कमावू शकतो. 

नक्की वाचा - 38 हजारांच्या नोकरीला मारली लाथ; 2 लाखांची गुंतवणूक आता दरमाह एक लाखाची कमाई

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनुसार, ३१ जुलैपर्यंत असेसमेंट इयर २०२६-२७ साठी ५.९ कोटींहून अधिक ITR फाइल करण्यात आले आहेत. हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. कारण AY 2025-26 साठी ७.३ कोटींहून अधिक ITR फाइल करण्यात आले होते. दरम्यान ३१ जुलैची डेडलाइन केवळ ITR-1 आणि 2 फाइल करणाऱ्यांसाठी होती. ITR-3 आणि 4 फाइल करणाऱ्यांसाठी शेवटची तारीख ३१ ऑगस्ट ठरविण्यात आली आहे. त्यामुळे या सीएची कमाई अधिक वाढू शकते. 

३१ जुलै आणि ३१ ऑगस्टमध्ये गोंधळून जाऊ नका

३१ जुलै ही सर्वसामान्य नोकरदार व्यक्ती आणि ज्या वैयक्तिक करदात्यांना त्यांच्या खात्यांचे ऑडिट करण्याची आवश्यकता नसते त्यांच्यासाठी शेवटची मुदत आहे. जर सरकारने कोणत्याही वर्षी ३१ ऑगस्टची तारीख वाढवली, तर ती विशेषतः अशा टॅक्स पेयरसाठी किंवा व्यवसायांसाठी असते ज्यांना त्यांच्या खात्यांचे ऑडिट करणं आवश्यक असतं. टॅक्सपेयर आणि व्यवसाय त्यांच्या खात्याचं ऑडिट योग्यरित्या दाखल करावं लागतं. यासाठी ही अंतिम मुदत वाढवली जाते.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com