Pune News: चिमुकलीचा हात लिफ्टमध्ये अडकला, आईसह सगळ्यांचीच धावपळ, अंगावर काटा आणणारा Video

हा प्रकार लक्षात येताच लिफ्टमधील महिलेसह उपस्थित नागरिक भयभीत झाले.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरातील गृहनिर्माण सोसायटीत लिफ्टच्या दरवाजाच्या कोपऱ्यात चिमुकलीचा हात अडकला होता
  • घटना घडत असताना चिमुकलीच्या आईसह अनेक लोक लिफ्टमध्ये होते व तातडीने मदत केली गेली
  • काही मिनिटांच्या प्रयत्नांनंतर चिमुकलीचा हात सुरक्षित बाहेर काढण्यात आला असून मोठा अनर्थ टळला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पुणे:

सूरज कसबे 

लिफ्टचा वापर करताना लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत गाफील राहणे किती धोकादायक ठरू शकते, याचा प्रत्यय पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरात आला आहे. एका गृहनिर्माण सोसायटीत लिफ्टच्या दरवाजाच्या कोपऱ्यात  चिमुकलीचा हात अडकल्याची थरारक घटना घडली. त्यावेळी त्या चिमुकलीची आई ही तिच्या सोबत होती. इतर काही लोक ही त्या लिफ्टमध्ये होते. ज्यावेळी तिचा हात सापडला त्यावेळी एकच धावपळ उडाली. ही सर्व दृष्य सीसीटीव्हीत कैद झाली. अंगावर आणणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.   

हात अकडकल्यानंतर तिला वाचवण्याचा प्रयत्न तिथे असलेल्या लोकांनी केले. सुदैवाने काही मिनिटांच्या प्रयत्नांनंतर हात सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. दिघीतील एका सोसायटीत ही घटना घडली. एक महिला आपल्या काही महिन्यांच्या चिमुकलीसह लिफ्टमधून जात होती. लिफ्ट इच्छित मजल्यावर थांबल्यानंतर दरवाजा उघडला. त्यानंतर तो पुन्हा बंद होऊ लागला. यावेळी चिमुकलीचा हात त्या दरवाजावर होता. त्याच वेळी दरवाजा बंद होताना त्या चिमुकलीचा हात लिफ्टच्या कोपऱ्यात अडकला. 

Advertisement

नक्की वाचा - Badlapur News: व्यावसायिक सिलेंडर बंद, हॉटेल व्यावसायिक महिलेची भन्नाट आयडिया, हॉटेल बाहेरच लावली...

हा प्रकार लक्षात येताच लिफ्टमधील महिलेसह उपस्थित नागरिक भयभीत झाले. चिमुकली वेदनेने रडत असतानाच तिला वाचवण्यासाठी तात्काळ प्रयत्न सुरू झाले. काही मिनिटांच्या धडपडीनंतर तिचा हात बाहेर काढण्यात आला. मोठा अनर्थ टळला. या घटनेचा सर्व प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे लिफ्ट वापरताना विशेषतः लहान मुलांबाबत कमालीची सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

नक्की वाचा - Latur News: वर्षभरात 189 अल्पवयीन मुली बेपत्ता, गायब होण्या मागचं धक्कादायक कारण आलं समोर, सर्वच हादरले

या आधी ही अशा घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे लहान मुलांना लिफ्टमध्ये नेताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. नाही तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनेनं पुन्हा एकदा ही बाब अधोरेखीत केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सर्व सोसायटीमध्ये व्हायरल होत आहे. शिवाय इमारतीत राहाणाऱ्या नागरिकांना विशेष आवाहन ही करण्यात येत आहे. त्यात काळजी घेण्याची सुचना करण्यात आली आहे.