- मोसीन शेख, प्रतिनिधी
Sharad Pawar And Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली झालेल्या निधनानंतर महाराष्ट्राचे राजकारण आणि पवार कुटुंबातील घडामोडींनी वेग घेतला आहे. सुनेत्रा पवार यांनी 31 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्या बारामतीत आहेत. दुसरीकडे राशप प्रमुख शरद पवार देखील आज बारामतीत उपस्थित आहेत. यामुळे दोन्ही नेत्यांची भेट होणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राजकारण एका बाजूला आणि कुटुंब एका बाजूला, असे समीकरण नेहमीच पवार कुटुंबाने जपलंय. पण यावेळेची परिस्थिती अतिशय वेगळी आणि संवेदनशील आहे.
(नक्की वाचा: Sharad Pawar News: सुनेत्रा पवार शपथविधीपासून ते अजित पवारांच्या अपघातापर्यंत, सर्वच मुद्यांवर शरद पवारांचे थेट भाष्य)
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत शरद पवारांची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं होतं की, शपथविधीबाबत कोणतीही कल्पना नाही, माझ्याशी कोणतीही चर्चा करण्यात आली नव्हती.
शरद पवार यांनी शपथविधीबाबतची माहिती स्पष्ट केल्यानंतरही कुटुंबातील ज्येष्ठ म्हणून सुनेत्रा पवार शरद पवार यांची भेट घेऊन आशीर्वाद घेणार का? की राजकीय मतभेट या भेटीमध्ये आड येतील? असे प्रश्न विचारले जात आहेत. राजकीय पक्ष वेगळे असले तरी संकट काळात पवार कुटुंब नेहमीच एकत्र दिसले आहेत, हाच वारसा पुढे जपला जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
(नक्की वाचा : Ajit Pawar News Live: अजित पवार शेवटच्या फोनमध्ये काय-काय बोलले? ऐका संपूर्ण Audio)
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची घोषणा 12 फेब्रुवारी रोजी होणार असल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं होतं. विलीनीकरण व्हावं, अशी अजित पवारांची इच्छा होती आणि याबाबत ते आशावादी होते, असेही शरद पवार म्हणाले होते.