जाहिरात

Sharad Pawar:सुनेत्रा पवार शपथविधीपासून ते अजित पवारांच्या अपघातापर्यंत,सर्वच मुद्यांवर शरद पवारांचे थेट भाष्य

Sharad Pawar On Ajit Pawar News: राशपचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेत अनेक मुद्यांवर थेट भाष्य केले.

Sharad Pawar:सुनेत्रा पवार शपथविधीपासून ते अजित पवारांच्या अपघातापर्यंत,सर्वच मुद्यांवर शरद पवारांचे थेट भाष्य
"Sharad Pawar On Ajit Pawar News: सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया"
PTI

Sharad Pawar On Ajit Pawar News: राशपचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी (4 फेब्रुवारी 2026) बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेत अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे. शरद पवार म्हणाले की, "58 वर्षात संसदेत माझी गैरहजेरी कधीही नव्हती. सभागृहात जाऊन मला अंदाजपत्रक मला ऐकता आलं नाही. दुर्दैवी अपघातामुळे दिल्ली जाऊ शकलो नाही".

सुनेत्रा पवार भेटायला आल्या तर...

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी सोहळ्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, "सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर मला भाष्य करायचं नाही. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी झाला, संधी दिली आनंद आहे. परस्परांना धीर देणं आणि पुढे कसं जायचं याकडे आमचे लक्ष आहे. राजकीय निर्णयाबद्दल आम्ही कोणाशीही चर्चा केलेली नाही".

सुनेत्रा पवार मला भेटायला आल्या तर मी त्यांना आनंदाने आशीर्वादे देईल, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिलीय. 

राष्ट्रवादी पक्ष विलीनीकरण मुद्दा

राष्ट्रवादी पक्ष विलीनीकरणाच्या मुद्यावर शरद पवार म्हणाले की, "या सर्व चर्चेत फडणवीस कुठेच नव्हेत, त्यामुळे त्यांना याबाबत भाष्य करण्याचा कोणताही अधिकार नाही. सध्या चर्चाच झाली नसताना त्याबद्दल भाष्य करणं योग्य नाही. माझा उल्लेख का केला हे समजलं नाही".

(नक्की वाचा: Ajit Pawar News: शेवटच्या श्वासापर्यंत जनतेचं काम! अजित पवारांचा अखेरचा फोन कॉल, मृत्यूआधी काय बोलले?)

अजित पवार यांचे अपघाती निधन

अजित पवार यांचा विमान अपघात हा घातपात असल्याची शंका अनेकांनी व्यक्त केली, याबाबत शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलंय की, "ऑथेंटिक माहिती मिळत नाही तोपर्यंत मी अपघातासंदर्भात उगीचच शंका घेणार नाही."

(नक्की वाचा: Sharad Pawar Sunetra Pawar Meeting: मोठी बातमी! शरद पवार आणि सुनेत्रा पवार बारामतीत, आज भेट होणार?)

अजित पवार यांचे स्मारक होणार?

अजित पवार यांचे स्मारक उभारण्याबाबत शरद पवार म्हणाले की, "पेपरमध्ये वाचलं की आम्ही स्मारक उभारणार आहोत, पण ही गोष्ट मला माहिती नाही. त्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे. मला ते ठावूक असलं पाहिजे, मात्र मी याबद्दलची नुसती चर्चा ऐकली आहे. याबद्दल काय करायचं याबद्दल एकत्र बसून चर्चा करू."

शरद पवार यांची पत्रकार परिषद VIDEO

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com