Pune Palkhi 2025 : पुणे पालखी सोहळ्यासाठी कसा असेल बंदोबस्त? कशी आहे पुणे पोलिसांची तयारी?

Pune News : आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त येत्या 20 जून ते 23 जून या कालावधीत संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुणे शहरातून मार्गक्रमण करतील.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune Palkhi 2025 : आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रातील संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवू लागल्या आहेत. पुणे मार्गे या सर्व पालख्या पंढरपुरात दाखल होती. पालखी सोहळ्यासाठी पुणे पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त येत्या 20 जून ते 23 जून या कालावधीत संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुणे शहरातून मार्गक्रमण करतील. या पालखी सोहळ्यादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सुमारे 8000 पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Pune Palkhi 2025 : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण; कसा असेल पालखीमार्ग, पाहा वेळापत्रक)

कसा असेल पोलिस बंदोबस्त?

  • अतिरिक्त आयुक्त- 4
  • पोलिस उपायुक्त - 10
  • सहाय्यक आयुक्त- 20
  • पोलिस निरीक्षक- 128
  • सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक- 513
  • पोलिस अंमलदार- 6143
  • एसआरपीएफ- एक कंपनी
  • होमगार्ड- 1240 
  • क्यूआरटी- 12
  • बीडीडीएस- सहा पथके

(नक्की वाचा-  Pune Palkhi 2025 : पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल; कुठले रस्ते बंद? पर्यायी मार्ग काय?)

पुण्यातील वाहतुकीतही बदल 

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. 19 जून रात्री 10 वाजेपासून ते 23 जून रात्री 1 वाजेपर्यंत लागू असतील. https://diversion.punepolice.gov.in/ या संकेतस्थळावर पालखी रथाचे लाइव लोकेशन आणि इतर सर्व माहिती जसे कुठल्या परिसरात कुठले रस्ते बंद आहेत आणि त्याला पर्यायी मार्ग काय आहेत या बद्दल सविस्तर माहिती देखील देण्यात आली आहे. तब्बल २३ एंट्री पॉइंटवरून जड, अवजड, स्लो मुव्हिंग, डंपर, मिक्सर या वाहनांना बंदी तर आहेच पण अंतर्गत वाहतुकीस देखील बंदी आहे. 


Topics mentioned in this article

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world