
Pune Palkhi : पुण्यात तुकाराम महाराजांची आणि ज्ञानेश्वर मऊलींची पालखी दोन दिवस मुक्कामी असणार आहे. त्या दरम्यान पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आलेला आहे. कारण लाखो वारकरी या दरम्यान पुण्यनगरीत वास्तव्यास असतात. तर अनेक VIP देखील या दरम्यान पालखीच्या दर्शनासाठी येतात. दोन्ही पालख्यांच्या मिळून एकूण ७१९ दिंड्या पुण्यात दोन दिवस मुक्कामी असतील.
या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. हे बदल १९ जून रात्री १० पासून ते २३ जून रात्री ११ पर्यंत लागू असतील. त्यासोबतच पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की रथाचं लाइव लोकेशन ट्रॅक करून मग दर्शनासाठी यावे म्हणजे गर्दी टाळू शकते आणि काही विपरीत घटना घडणार नाही. https://diversion.punepolice.gov.in/ या संकेतस्थळावर पालखी रथाचे लाइव लोकेशन आणि इतर सर्व माहिती जसे कुठल्या परिसरात कुठले रस्ते बंद आहेत आणि त्याला पर्यायी मार्ग काय आहेत या बद्दल सविस्तर माहिती देखील देण्यात आली आहे. तब्बल २३ एंट्री पॉइंटवरून जड, अवजड, स्लो मुव्हिंग, डंपर, मिक्सर या वाहनांना बंदी तर आहेच पण अंतर्गत वाहतुकीस देखील बंदी आहे.
(नक्की वाचा- Pune Palkhi 2025 : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण; कसा असेल पालखीमार्ग, पाहा वेळापत्रक)
वाहतुकीत काय आहेत बदल?
- बोपोडी चौक (हॅरिश ब्रिज, खडकी)
- राजीव गांधी ब्रिज - औंध
- ब्रेमेन चौक
- बोपखेल फाटा
- खराडी बायपास चौक
- केसनंद गाव
- केसनंद फाटा चौक
- लोणीकंद (थेऊर फाटा)
- तुळापूर फाटा
- राधा चौक
- सुस रोड
- चांदणी चौक
- वारजे जंक्शन
- वडगाव ब्रिज
- नवले ब्रिज
- भूमकर चौक
- कात्रज चौक
- खडी मशीन चौक
- मंतरवाडी फाटा
- वैदुवाडी चौक
- थेऊर फाटा
- दिवे घाट
- रविदर्शन
पुणे शहरातील अंतर्गत वाहतुकीत देखील मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. आणि आवश्यकतेनुसार फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, रेंज हिल ते संचेती चौक, डेक्कन ते कोथरूड, लक्ष्मी रोड ते बेलबाग चौक, शिवाजी रोड, डेक्कन वाहतूक विभाग ते आपटे रोड, गणेशखिंड रोड आणि इतर मुख्य रस्ते यातही बदल करण्यात येणार आहेत.
(नक्की वाचा- Pune Palkhi 2025 : पालखी मार्गावर मुसळधार पावसाचे संकेत, पंढरपुरात भाविकांसाठी पहिल्यांदाच केली मोठी सोय)
वाहने कुठे पार्किंग करू शकता?
- रेस कोर्स परिसर
- एस पी महाविद्यालय
- न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड परिसर
- SSPMS व COEP महाविद्यालय मैदान, सिंचन, आपटे प्रशाला
- न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, आबासाहेब गरवारे कॉलेज, विमलाबाई गरवारे कॉलेज
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world