PMC Election Result: हायहोल्टेज लढाईत अमोल बालवडकरांनी मारली बाजी; प्रभाग 9मध्ये राष्ट्रवादीचे 2 शिलेदार विजयी

Pune Election Result 2026: भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेल्या अमोल बालवडकर यांनी भाजपचे उमेदवार लहू बालवडकर यांचा 896 मतांनी पराभव केला.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune Election Result 2026: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात प्रभाग 9 (बाणेर-बालेवाडी) आणि प्रभाग ३२ (वारजे-पॉप्युलर नगर) मधून अत्यंत धक्कादायक आणि चुरशीचे निकाल समोर आले आहेत. प्रभाग ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे, तर प्रभाग ३२ मध्ये भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व गाजवत 'क्लीन स्वीप' केला आहे.

पुणे महानगरपालिकेच्या निकालात आज अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सर्वात जास्त चर्चा असलेल्या बाणेर-बालेवाडीच्या प्रभाग 9 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) भाजपला मोठे धक्के दिले आहेत. पुण्यातील सर्वात हायव्होल्टेज लढत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रभागात शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा कायम होती.

Advertisement

अमोल बालवडकर यांचा विजय

भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेल्या अमोल बालवडकर यांनी भाजपचे उमेदवार लहू बालवडकर यांचा 896 मतांनी पराभव केला. या विजयाने भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबुराव चांदेरे यांनी भाजपच्या गणेश कळमकर यांचा 1415 मतांनी पराभव करत आपला गड राखला आहे. राष्ट्रवादीने दोन जागा जिंकल्या असल्या तरी भाजपच्या रोहिणी चिमटे आणि मयुरी कोकाटे यांनी देखील याठिकाणी विजय मिळवला आहे.

प्रभाग 32 भाजपचं पॅनल विजयी

वारजे परिसरात भाजपचे पूर्ण पॅनेल निवडून आल्याने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. सचिन दोडके आणि सायली वांजळे यांची जादू याठिकाणी चालली आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सचिन दोडके आणि सायली वांजळे यांनी मतदारांचा विश्वास जिंकला आहे. या प्रभागातून सचिन दोडके, सायली वांजळे, भारत भूषण बराटे आणि हर्षदा भोसले हे चारही भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपने शिरकाव करत पूर्ण सत्ता मिळवली आहे.


Topics mentioned in this article

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world