Pune News: PMPML चा पुन्हा कहर; 9 वर्षांच्या मुलीचा बसखाली चिरडून मृत्यू, गरोदर बहीण गंभीर, पाहा CCTV VIDEO

Pune PMPML Accident: पिंपरी-चिंचवड शहरात अपघातांची मालिका सुरूच आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune PMPML Accident: दोघी बहिणी रस्ता ओलांडत असतानाच, भरधाव वेगात आलेल्या पीएमपीएमएलच्या बसने त्यांना जोरदार धडक दिली. 
पुणे:

सुरज कसबे, प्रतिनिधी

Pune PMPML Accident: पिंपरी-चिंचवड शहरात अपघातांची मालिका सुरूच असून, एका अत्यंत हृदयद्रावक घटनेत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) भरधाव ई-बसने धडक दिल्याने एका 9 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.या दुर्घटनेत तिची गरोदर बहीण गंभीर जखमी झाली आहे. तळवडे-निगडी रस्त्यावर तळवडे चौकाजवळ मंगळवारी दुपारी सुमारे 1.30 वाजता हा अपघात झाला असून, घटनेचा थरार सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आला आहे.

काय आहे घटना?

मृत्यू झालेल्या मुलीचे नाव सुधा बिहारीलाल वर्मा ( 9) असे आहे, तर गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव राधा राममनोज वर्मा असे आहे. या घटनेनंतर पोलिसांनी बसचालक किरण भटू पाटील याला ताब्यात घेतले आहे. राधा आणि तिचा पती तळवडे येथील एका खासगी कंपनीत कामाला आहेत. राधा गरोदर असल्याने मदतीसाठी तिच्या लहान बहीण सुधाला दोन महिन्यांपूर्वी गावावरून बोलावून घेतले होते. त्यांचा भाऊ देखील त्यांच्यासोबत राहतो आणि तोही खासगी कंपनीत नोकरी करतो.

( नक्की वाचा : Pune News : बस स्टॉपवर केली मैत्री आणि शाळेच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर... संतापजनक घटनेनं पुणे हादरलं! )

मंगळवारी दुपारी हा अपघात झाला. राधाचा पती रात्रपाळी करून घरी झोपला होता, तर राधा कामावर गेली होती. दुपारी 1 च्या सुमारास ती घरी परतली. तिने जेवण केले आणि कामावर परत जाण्यासाठी ती लहान बहीण सुधाला सोबत घेऊन पायी निघाली होती. दोघी बहिणी रस्ता ओलांडत असतानाच, भरधाव वेगात आलेल्या पीएमपीएमएलच्या बसने त्यांना जोरदार धडक दिली. 

या धडकेत सुधा गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. तर, तिची गरोदर बहीण राधादेखील गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.

Advertisement

इथे पाहा CCTV VIDEO