रेवती हिंगवे, प्रतिनिधी
Pune News : पुणे शहराला हादरवून सोडणारी एक अत्यंत धक्कादायक घटना विश्रांतवाडी परिसरातून समोर आली आहे. येथील एका 14 वर्षांच्या अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी तातडीने कारवाई करत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुनाकिब नासिर अन्सारी (Munakib Nasir Ansari) आणि पीडित अल्पवयीन मुलगी हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे होते. आरोपी हा महाविद्यालयीन विद्यार्थी असून, त्यांची ओळख एका बस स्टॉपवर झाली होती. हा संपूर्ण प्रकार 4 डिसेंबर 2025 रोजी घडला.
( नक्की वाचा : Akola News : अकोल्यात 13 वर्षांच्या मुलीनं संपवलं आयुष्य, शाळेतील 'त्या' प्रकरणामुळे उचललं टोकाचं पाऊल! )
4 डिसेंबरच्या दिवशी आरोपी मुनाकिब अन्सारी याने अल्पवयीन मुलीला शाळेत सोडतो, असे सांगितले. मुलीचा विश्वास संपादन करून त्याने तिला स्वत:च्या दुचाकीवर बसवले. मात्र, शाळेत न सोडता, आरोपीने तिला जबरदस्तीने एका खोलीत नेले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांनी या नराधमाविरोधात विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी आरोपी मुनाकिब नासिर अन्सारी याला तात्काळ बेड्या ठोकल्या असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
( नक्की वाचा : Pune News : एक बाई आणि 12 भानगडी! ॲसिड हल्ला ते पुरुषांवर जबरदस्ती ! 'या' बाईची संपूर्ण पुण्यात चर्चा )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world