जाहिरात

Pune News: पुणेकरांनी सोडला सुटकेचा निश्वास! पुण्यात दिवसा कोण करायचा घरफोड्या? कोण होता मास्टरमाईंड?

पुण्यात काही दिवसांपूर्वी घरफोडीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास करणाऱ्या चोरट्यांनी पुण्यात एकच दहशत माजवली होती.

Pune News:  पुणेकरांनी सोडला सुटकेचा निश्वास! पुण्यात दिवसा कोण करायचा घरफोड्या? कोण होता मास्टरमाईंड?
Pune Robbery Crime News
पुणे:

रेवती हिंगवे, प्रतिनिधी

Pune Robbery News : पुण्यात काही दिवसांपूर्वी घरफोडीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास करणाऱ्या चोरट्यांनी पुण्यात एकच दहशत माजवली होती. घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगारांची मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक चोरीची घटना घडली होती.त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि आरोपी चोरट्यांना अटक केली. या आरोपींकडे एकूण 8 लाख 11 हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सुनील मल्हारी तलवारे, शिवानंद दशरथ मोची असं अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींवर याआधीही गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुणे शहरासह महाड आणि रायगड जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही आरोपींवर घर फोडीचे गुन्हे दाखल आहेत.

दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना केले जेरबंद

मिळालेल्या माहितीनुसार, 18 नोव्हेंबर 2025 रोजी 428 मंगळवार पेठ येथील फिर्यादी यांच्या राहत्या घराचे बंद दरवाजे अज्ञात इसमाने तोडले आणि घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी घरातील 7 लाख 29 हजार रुपयांच्या किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी केली होती. त्यानंतर फिर्यादीने समर्थ पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी कलम 305 (1),331 (1)(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. 

नक्की वाचा >> सैनिक पतीसोबत सासरवाडीकडे निघाली..रस्त्यातच महिलेचं जीवन संपलं! स्वप्नातही विचार केला नसेल असं घडलं..

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले अन्..

त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख निश्चित करण्यात आली. खराडी पोलीस स्टेशन, चंदनगर पोलीस स्टेशन व महाड शहर पोलीस स्टेशन (रायगड) हद्दीत देखील घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आलं.अपर पोलीस आयुक्त,पश्चिम प्रादेशीक विभाग,पुणे,राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-01, पुणे शहर,कृषिकेश रावले,सह पोलीस आयुक्त,फरासखाना विभाग,पुणे शहर अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक समर्थ पोलीस स्टेशन, उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चेतन मोरे,यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चोरी व दरोडा पथक 2 सह पोलीस निरीक्षक बेरड,पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे,पोलीस अंमलदार अमोल गावडे, इम्रान शेख,शरद घोरपडे, भाग्येश यादव,विक्रांत सासवडकर,विनायक येवले यांनी ही कारवाई केली.

नक्की वाचा >> मुंबई होणार झोपडपट्टीमुक्त! लाखो झोपडपट्टीवासीयांना दिलासा, सरकारचा मोठा निर्णय

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com