Pune News: दिवाळीदरम्यान 'या' फटाक्यांवर पूर्णपणे बंदी; पुणे पोलिसांकडून निर्देश जारी

Pune News: सार्वजनिक ठिकाणी फटाके उडवण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.  रस्ते, पूल, घाट, सेतू किंवा कोणत्याही प्रमुख मार्गावर फटाके उडवण्यास मनाई आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, पुणे

Pune News: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी ध्वनिप्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्णपणे बंदी घातली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार ही बंदी लागू करण्यात आली असून, याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

फटाक्यांसंबंधी सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश

  • ध्वनी मर्यादा: फटाक्यांचा आवाज 124 डेसिबलपेक्षा जास्त नसावा.
  • साखळी फटाक्यांवर बंदी: 100 पेक्षा जास्त साखळी फटाक्यांच्या उत्पादन, विक्री आणि वापरास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
  • शांतता क्षेत्रात मनाई: शाळा, रुग्णालय आणि न्यायालयाच्या परिसरापासून 100 मीटरच्या आत फटाके उडवण्यास सक्त मनाई आहे. या परिसराला 'शांतता क्षेत्र' म्हणून घोषित केले आहे.

'या' ठिकाणी फटाके उडवण्यास सक्त मनाई

याशिवाय, सार्वजनिक ठिकाणी फटाके उडवण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.  रस्ते, पूल, घाट, सेतू किंवा कोणत्याही प्रमुख मार्गावर फटाके उडवण्यास मनाई आहे. रस्ते, पूल, घाट, सेतू, मार्गांपासून 10 मीटरच्या परिसरातही फटाके उडवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

फटाके विक्रेत्यांसाठी तात्पुरते परवाने

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही फटाके विकणाऱ्यांना 20 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत तात्पुरते परवाने दिले जाणार आहेत. पुणेकरांना दिवाळी शांततेत आणि सुरक्षितपणे साजरी करता यावी, तसेच ध्वनिप्रदूषण टाळता यावे, यासाठी पोलिसांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर पोलीस पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार तातडीने कठोर कारवाई करतील.
 

Topics mentioned in this article