गणेशोत्सवादरम्यान पुण्यात 3 दिवस ड्राय डे; पुणे पोलीस आयुक्तांची माहिती

येत्या 7, 17, 18 सप्टेंबरला पुण्यात दारू विक्रीला बंदी असणार आहे. फरासखाना, विश्रामबाग, खडकी या पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सर्व दारूची दुकाने गणेशोत्सव काळात बंद ठेवण्यात यावी, अशी शिफारस करण्यात आली आहे, असं अमितेश कुमार यांनी सांगितलं.  

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, पुणे

पुण्यातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय आहे. कोयता गँग, अमली पदार्थांचा विळखा यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून पुणे चर्चेत आलं आहे. शिक्षणाचं माहेरघर, सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्यातील चित्र हळूहळू बदलत आहे. यामुळे पोलिसांवर देखील दबाव आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावर आणि गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर आज पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्रकार परिषद घेतली.

पुण्यात गंभीर गुन्ह्यातील 756 अल्पवयीन आरोपींची यादी तयार करण्यात आल्याची माहिती अमितेश कुमार यांनी दिली. मी आल्यापासून 209 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. गांजा किंवा नशेचे पदार्थाविरोधात पोलिसांनी जोरात काम सुरु केलं आहे. आज आणि उद्या मोबाईल चोरावर कारवाई केलेली दिसेल. बाहेरून येऊन शहरातील लॉजमध्ये हे  चोर राहतात. आम्ही दोन दिवसात या चोरावर कारवाई करणार आहोत, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. 

पुण्यात 3 दिवस ड्राय डे

येत्या 7, 17, 18 सप्टेंबरला पुण्यात दारू विक्रीला बंदी असणार आहे. फरासखाना, विश्रामबाग, खडकी या पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सर्व दारूची दुकाने गणेशोत्सव काळात बंद ठेवण्यात यावी, अशी शिफारस करण्यात आली आहे, असं अमितेश कुमार यांनी सांगितलं.  

सर्व गणेश मंडळासोबत आमची बैठक झाली आहे. ड्रग्स मुक्त पुण्यासाठी गणेश मंडळ आणि गणेश भक्तांसोबत आम्ही बोलतोय. सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट करणाऱ्यांवर  सर्जिकल स्ट्राइक करण्यात येईल. पोलिसांचे नाव वापरून गैरकृत्य करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही अमितेश कुमार यांनी दिला. 

Advertisement
Topics mentioned in this article