Pune News: पुण्यात 5 नवीन पोलीस स्टेशन्सना मंजुरी; कोणत्या परिसराला होणार फायदा? पाहा यादी

Pune News: पुणे शहराच्या वाढत्या विस्ताराचा विचार करून राज्य सरकारने 5 नवीन पोलीस ठाण्यांची अधिसूचना जारी केली आहे. मांजरी, लक्ष्मीनगर, नऱ्हे, लोहगाव आणि कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी या ठिकाणी ही नवीन पोलीस ठाणी कार्यान्वित होणार आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune New police Stations: पुणे शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तारत जाणारी उपनगरे लक्षात घेता, गृहमंत्रालयाने पुणे पोलीस आयुक्तालयांतर्गत 5 नवीन पोलीस ठाणी निर्माण करण्यास अधिकृत मान्यता दिली आहे. 25 मार्च रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत या नवीन पोलीस ठाण्यांच्या भौगोलिक सीमाही निश्चित करण्यात आल्या आहेत.

नवीन 5 पोलीस ठाणी आणि त्यांच्या सीमा

  1. मांजरी पोलीस ठाणे: हडपसर आणि फुरसुंगी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मांजरी बुद्रुक, शेवाळेवाडी आणि मुळा-मुठा नदीकाठचा भाग या ठाण्याच्या कक्षेत येईल.
  2. लक्ष्मीनगर पोलीस ठाणे: येरवडा, शास्त्रीनगर, संगमवाडी आणि कल्याणीनगर या भागातील कायदा व सुव्यवस्था या नवीन ठाण्यामार्फत हाताळली जाईल.
  3. नऱ्हे पोलीस ठाणे: नवले पूल, वडगाव खुर्द, सनसिटी आणि आंबेगाव या परिसरातील नागरिकांना आता नऱ्हे पोलीस ठाण्याचा आधार मिळेल.
  4. लोहगाव पोलीस ठाणे: विमानतळ परिसर, धानोरी आणि वेगाने विकसित होणाऱ्या निवासी झोनवर या ठाण्याचे नियंत्रण असेल.
  5. कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी ठाणे: मॅंगो वूड्स सोसायटी ते काळेपडल, तानाजी मालुसरे रोड, अंतुलेनगर, ट्रिनिटी कॉलेज आणि बोपदेव घाट माची ते भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भाग यात समाविष्ट असेल.

(नक्की वाचा-  Ashok Kharat: 'कॅप्टन' खरातच्या आजारपणाचे गुपित उघड! अर्धांगवायूचा झटका येण्यामागचं कारण आलं समोर)

पोलीस आयुक्तांची प्रतिक्रिया

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. "नवीन पोलीस ठाण्यांमुळे अस्तित्वात असलेल्या युनिट्सवरील ताण कमी होईल. यामुळे पोलिसांचा घटनास्थळी पोहोचण्याचा वेग वाढेल आणि बीट-लेव्हल पेट्रोलिंग अधिक मजबूत होईल," असे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

(नक्की वाचा-  Ashok Kharat: अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड; मविआ सरकारही भोंदूबाबावर मेहेरबान असल्याचे समोर)

ही नवीन पोलीस ठाणी केवळ इमारतीपुरती मर्यादित नसून ती नियंत्रण कक्ष (Control Room), पेट्रोलिंग नेटवर्क आणि क्राईम मॉनिटरिंग सिस्टिमशी तांत्रिकदृष्ट्या जोडली जाणार आहेत. यामुळे गुन्हेगारांवर वचक बसवण्यास मदत होईल.
 


Topics mentioned in this article

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world