Pune News : नववर्षात पुण्यात प्रवास करताय? 'हा' नियम मोडणाऱ्या 240 वाहनचालकांवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई!

थर्टी फर्स्टचा जल्लोषात समारोप झाल्यानंतर आज नूतन वर्ष 2026 चं स्वागतही मोठ्या दिमाखात होत असल्याचं पाहायला मिळत आहे.नववर्षाच्या सेलिब्रेशनचा सर्वत्र गाजावाजा होत असतानाच काही वाहनचालक मद्य प्राशन करून प्रवास करत असल्याचं समोर आलंय.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune Police Latest News
पुणे:

Pune Police Latest News : थर्टी फर्स्टचा जल्लोषात समारोप झाल्यानंतर आज नूतन वर्ष 2026 चं स्वागतही मोठ्या दिमाखात होत असल्याचं पाहायला मिळत आहे.नववर्षाच्या सेलिब्रेशनचा सर्वत्र गाजावाजा होत असतानाच काही वाहनचालक मद्य प्राशन करून प्रवास करत असल्याचं समोर आलंय. हे चालक मद्यपान करून वाहन चालवत असल्याने त्यांच्यासह नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठी मोहिम राबवली आहे.

या मोहिमेअंतर्गत पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेतील 13 वाहतूक विभागांमार्फत एकूण 47 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. या नाकाबंदी दरम्यान 220 दुचाकीस्वार, 20 चारचाकी वाहनचालक,असे एकूण 240  वाहनचालकांनी मद्यप्राशन केल्याचं आढळून आलं. या वाहनचालकांविरोधात न्यायालयात “ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह” अंतर्गत खटले दाखल करण्यात येत आहेत.

नक्की वाचा >> Pune News : अन् पूजा मोरे पत्रकार परिषदेत ढसाढसा रडल्या, म्हणाल्या, "राजकारण घाणेरडं..पण माझ्या बापाने.."

मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर होणार कारवाई

मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या अशा चालकांवर वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे,पोलीस सह आयुक्त डॉ.राशीकांत महावरकर व अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांच्याकडून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतूक शाखेमार्फत विशेष मोहिम राबविण्यात आलीय. 

नक्की वाचा >> Pune News : पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीला मोठा धक्का, करिष्मा बारणेंसह या उमेदवारांचे AB फॉर्म रद्द, कारण काय?

 "वाहनचालकांनी मद्यप्राशन न करता वाहने चालवावीत व होणारी न्यायालयीन कारवाई टाळावी", असे आवाहन पोलीस उपायुक्त  विवेक पाटील, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने करण्यात आले आहे.