जाहिरात

पुणे पोर्शे अपघात : जामीन मिळाल्याच्या खुशीत माजोरड्या आरोपीचं रॅप साँग?

Pune Porshe Case : या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर आरोपीचा मस्तवालपणा कायम होता, असा दावा करणारा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. 

पुणे पोर्शे अपघात : जामीन मिळाल्याच्या खुशीत माजोरड्या आरोपीचं रॅप साँग?
पुणे:

पुण्यातल्या कल्याणीनगर भागात शनिवारी रात्री अल्पवयीन मुलानं भरधाव पोर्शे कार चालवत दिलेल्या धडकेत 2 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपीला अवघ्या 15 तासांमध्ये जामीन मिळाला. हा जामीन मिळाल्यानं सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत होता. आरोपीचं वय 18 वर्षांपेक्षा कमी असलं तरी त्याच्यावर सज्ञान समजून कारवाई करण्यात यावी, अशी पुणे पोलिसांनी केली होती. पुणे पोलिसांच्या पाठपुराव्यानंतर आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आालीय. या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर आरोपीचा मस्तवालपणा कायम होता, असा दावा करणारा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

या प्रकरणातला एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामध्ये जामीन मिळाल्याच्या खुशीत हा आरोपी रॅप साँग म्हणत आहे. रॅप साँगमधून त्यानं लोकांना प्रचंड शिवीगाळ केलीय. त्याचबरोबर पुन्हा रस्त्यावर येण्याची भाषा केली आहे. या नव्या व्हिडिओमुळे आरोपीला त्याच्या गुन्ह्याबद्दल कोणताही पश्चाताप नव्हता, अशीच टीका आता होत आहे. दरम्यान या हा व्हिडिओ  आरोपीचा नाही, असा दावा त्याचे कुटुंबीय तसंच वकिलांनी केलाय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल असून 'NDTV मराठी' या व्हिडिओची पृष्टी करत नाही.  

पोर्शे कार अपघातात अल्पवयीन आरोपीला पहिल्याच दिवशी अटक केली होती. त्यानंतर बाल न्याय बोर्डाने त्याला शिक्षा सुनावली होती. ज्यामध्ये 'अपघात'या विषयावर 300 शब्दाचा निबंध, वाहतूक पोलिसांसोबत 15 दिवस काम या शिक्षेचा समावेश होता. या निकालाचा पोलिसांनाही धक्का बसला. 

( नक्की वाचा : पुण्याच्या दुर्घटनेची मुंबईत पुनरावृत्ती, अल्पवयीन बाईकस्वाराच्या धडकेत तरुणाचा मृत्यू )

आरोपीच्या आजोबांची चौकशी

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांची  गुरुवारी (23 मे) चौकशी करण्यात आली. पुणे गुन्हे शाखेनं त्यांची चौकशी केली. सुरेंद्र यांचा मुलगा विशाल अग्रवाल फरार झाल्यानंतर त्याला पळून जाण्यास कोणत्या प्रकारे मदत केली आहे का ? तसेच विशाल अग्रवाल येणे लपवून ठेवलेले मोबाईल बाबत नेमकी काय माहिती आहे?ही घटना घडल्यानंतर त्यांनी कोणाकोणला संपर्क केला याबाबत पोलिसांनी तपास केलाय.

( नक्की वाचा : 4 जणांचा बळी घेणाऱ्या जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात तब्बल 16 दिवसांनतर कारवाई )

विशाल अग्रवालला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी छत्रपती संभाजीनगरमध्ये लपला होता. त्याने आणखी काही पुरावे लपवल्याचा संशय आहे, अन्यथा त्याला लपून बसण्याचं कोणतंही कारण नव्हतं, असा युक्तीवाद पुणे पोलिसांच्या वकिलांनी कोर्टात केला. 
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com