जाहिरात
Story ProgressBack

4 जणांचा बळी घेणाऱ्या जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात तब्बल 16 दिवसांनतर कारवाई

Jalgaon hit and run case : जळगावमधील 'हिट अँड रन' प्रकरणात तब्बल 16 दिवसांनी पोलिसांनी कारवाई केली आहे.

Read Time: 2 mins
4 जणांचा बळी घेणाऱ्या जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात तब्बल 16 दिवसांनतर कारवाई
जळगाव:


मंगेश जोशी, प्रतिनिधी

पुण्यातल्या पोर्शे कार अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले आहेत. पुण्यासारखाच प्रकार 7 मे रोजी जळगावमध्ये झाला होता. या प्रकरणात चार जणांचा बळी घेणाऱ्या दोन आरोपींना मुंबईत ताब्यात घेण्यात आलं आहे.  संशयीतांमध्ये बिल्डर आणि राजकारण्याच्या मुलाचा समावेश आहे. अर्णव अभिषेक कौल आणि अखिलेश संजय पवार असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. त्यांना शुक्रवारी (24 मे) कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

7 मे रोजी जळगाव मधील रामदेव वाडी जवळ दोन कारचा रेस मध्ये समोरून येणाऱ्या दुचाकीला एका कारणे धडक देत दुचाकी वरील एका महिलेसह तिचे दोन मुलं हे जागीच ठार झाले होते तर 17  वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या अपघातग्रस्त कारमध्ये गांजा देखील सापडला होता. जमावानं कारमधील दोन जणांना मारहाण देखील केली होती. 

( नक्की वाचा : पुण्यातल्या पोर्शे दुर्घटनेची चर्चा पण नागपुरच्या 'त्या' मर्सिडीज अपघाताचे काय? )
 

या घटनेनंतर संशयीतांना मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  संशयित हे बिल्डर व राजकारणाचे मुलं असल्याने या प्रकरणात पोलिसांवर दबाव असल्यामुळे कारवाई होत नसल्याचा आरोप मृतांचे नातेवाईक तसंच वेगवेगळ्या संघटनांच्या वतीने करण्यात आला होता. 

( नक्की वाचा : अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी आखला होता पळून जाण्याचा प्लॅन, पोलिसांनी कसा उधळला? )
 

पुण्यात घडलेल्या घटनेनंतर याप्रकरणी कारवाईची सर्व स्तरावरून मागणी केली जात होती. अखेर 16 दिवसानंतर जळगाव पोलिसांनी बिल्डर व्यावसायिकाचा मुलगा अर्णव कौल आणि राजकारण्याचा मुलगा अखिलेश पवार यास ताब्यात घेतले आहे. त्यांना शुक्रवारी  जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी यांनी दिली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
संतापजनक : 'माझ्यासोबत चल...', मित्रानं केला विवाहित महिलेसोबत भयंकर प्रकार
4 जणांचा बळी घेणाऱ्या जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात तब्बल 16 दिवसांनतर कारवाई
32-year old man killed after being hit by minor's motorcycle in mumbai
Next Article
पुण्याच्या दुर्घटनेची मुंबईत पुनरावृत्ती, अल्पवयीन बाईकस्वाराच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
;