प्रतीक्षा पारखी, पुणे
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात पोलिसांना आरोपीच्या वडिलांनंतर आता आजोबांना देखील अटक केली आहे. आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ड्रायव्हरवर दबाव टाकून त्याला धमकावल्याप्रकरणी सुरेंद्र अग्रवाल यांच्याविरोधात पोलिसांना कारवाई केली आहे. याबाबत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हरने प्राथमिक तपासात मी गाडी चालवत असल्याचे सांगितले होते. मात्र त्याच्यावर अग्रवाल यांनी दबावा आणला होता. सुरेंद्र अग्रवाल यांनी घटना घडल्यानंतर ड्राइव्हरला घरी जाऊ दिलं नाही. त्याला अपल्या घरी नेऊन त्याचा फोन जप्त केला. तिथे त्याला पैशाचे आमिष दाखवले गेले. ड्रायव्हरला कुठे जायचं नाही, कुणाशी संपर्क करायचा नाही असं सांगून डांबून ठेवण्यात आलं.
रात्रभर ड्रायव्हर घरी आला नाही म्हणून त्याचे कुटुंबीय अग्रवाल यांच्या घरी पोहचले. ड्राइव्हरला डांबून ठेवलं आहे हे कळताच त्याचा घरच्यांनी आरडाओरडा केल्यावर त्याला सोडलं. पोलिसांच्या चौकशी दरम्यान ड्रायव्हर खूप घाबरलेला दिसला. दोन दिवस ड्रायव्हरची सखोल चौकशी केल्यावर त्याने कबुली दिली, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली.
(नक्की वाचा- विशाल अग्रवालच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवार चिडून म्हणाले...)
ड्रायव्हरला ज्या रूममध्ये डांबून ठेवलं त्याचा पंचनामा करण्याचं काम सुरू आहे. ज्या प्रकारे ड्रायव्हरवर दबाव तंत्र आणि पैशाचे आमिष दाखवण्यात आले त्याचा ड्रायव्हरला मानसिक धक्का बसला आहे. ड्रायव्हरने घातलेले कपडे घातले हस्तगत करण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.
(नक्की वाचा - पुणे पोर्शे अपघात प्रकरणात खळबळजनक खुलासा; स्थानिक पोलिसांची भूमिका संशयास्पद)
अग्रवाल यांच्या घराची तपासणी सुरु
सुरेंद्र कुमार यांनी ड्रायव्हर गंगाधर डोळस यांना ज्या खोलीत डांबून ठेवलं होतं, त्या खोलीचा पंचनामा केला जात आहे. तसेच ड्रायव्हरने त्या दिवशी घातलेले जे कपडे होते ते हस्तगत करण्याचे काम सुरु आहे. सुरेंद्रकुमार अग्रवाल यांच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज, घराचे रजिस्टर सगळं चेक केलं जात आहे. गुन्हे शाखेकडून सुरेंद्र अग्रवाल यांच्या घरावर छापेमारी सुरू आहे, अशी माहितीही पोलीस आयुक्तांनी दिली आहे.