जाहिरात
Story ProgressBack

विशाल अग्रवालच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवार चिडून म्हणाले...

पुणे कल्याणीनगर दुर्घेटनेवरील पत्रकारांचा प्रश्न ऐकताच शरद पवारांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले.

Read Time: 2 mins
विशाल अग्रवालच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवार चिडून म्हणाले...
पुणे:

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये भरधाव पोर्शे कार चालवून झालेल्या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय. या अपघातामधील मुख्य आरोपी अल्पवयीन असून त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आलीय. तर त्याचे वडिल विशाल अग्रवालसह अन्य 6 जणांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. या प्रकरणाचे देशभर पडसाद उमटले. पण, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी घटनेला 72 तासांपेक्षा जास्त कालावधी उलटल्यानंतरही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. त्यांच्या मौनाचे वेगवेगळे अर्थ काढले जात होते. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. पत्रकारांचा प्रश्न ऐकताच शरद पवारांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले पवार?

राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर लक्ष वेधण्यासाठी शरद पवारांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये पुण्यातील दुर्घटनेवर पवारांना प्रश्न विचारण्यात आला. पुणे अपघात प्रकरणात उपमुख्यमंत्री तसंच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार शांत का आहेत? असा प्रश्न पत्रकारांनी पवारांना विचारला. त्यावर ते का बोलत नाहीत हे प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा असं उत्तर पवारांनी दिलं. 

या प्रकरणातल्या आरोपींच्या वकिलांशी आपलेही संबंध असल्याच्या चर्चा आहेत, असा पुढचा प्रश्न पत्रकारांनी पवारांना विचारला. हा प्रश्न विचारताच त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. 'एखाद्या वकिलाला मी भेटलो असेल तर त्याचा संबंध याच्याशी लावता तुम्ही... प्रत्येक गोष्टीवर मीच भाष्य करावे, असे गरजेचे नाही. या प्रकरणात गृहमंत्र्यांनी जबाबदारी पार पाडली हे दिसल्यानंतर उगीच याला वेगळे स्वरूप देण्याची आवश्यकता नाही.' असं चिडून उत्तर पवारांनी त्यावर दिलं. 

( नक्की वाचा : 1 तास TV, 2 तास गेम : रिमांड होममध्ये असा जाणार बिल्डरपुत्राचा दिवस, काय मिळणार खायला? )

विशाल अग्रवालला न्यायालयीन कोठडी

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील सर्व सहा आरोपींना आज (शुक्रवार, 24 मे) न्यायालयात हजर करण्यात आलं. सर्वांना आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. विशाल अग्रवाल ( मुलाचे वडील)
प्रल्हाद भुतडा ( कोझी हॉटेलचा मालक),  सचिन काटकर ( कोझी हॉटेलचा व्यवस्थापक),  संदीप सांगळे ( ब्लॅक बारचा मालक),  नितेश शेवाणी (हॉटेल कर्मचारी) आणि जयेश गावकर (हॉटेल कर्मचारी) या सर्वांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
Dombivli MIDC Blast : डोंबिवली स्फोट प्रकरणात मोठी कारवाई, मुख्य आरोपीला अटक
विशाल अग्रवालच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवार चिडून म्हणाले...
Zero water storage in Nazre Dam of Purandar
Next Article
नाझरे धरणात शून्य पाणी साठा, पुरंदर बारामतीला फटका बसणार?
;