प्रतीक्षा पारखी, पुणे
पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघाताचा तपास जसजसा पुढे सरकतोय तसे अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. अपघातानंतर पोलिसांना तपासात हलगर्जीपण दाखल्याचा प्रकार समोर येत आहे. कल्याणीनगर येथे पहाटे अडीचच्या सुमारास अपघात घडल्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलीस निरीक्षक आणि साहाय्यक पोलीस निरीक्षकाने पोलीस नियंत्रण कक्षाला या घटनेची माहितीच कळवली नसल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तसेच नाईट राऊंडचे पोलीस उपायुक्त, स्थानिक परिमंडळाचे उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना देखील याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिलेली नव्हती, अशी देखील माहिती समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
(नक्की वाचा - 2 FIR, 2 ब्लड रिपोर्ट, अपघातावेळी कार कोणी चालवली? पुणे पोलीस आयुक्तांच्या पीसीमध्ये मोठे खुलासे)
अपघाताची माहिती दडवून ठेवण्यामागे या निरीक्षक आणि साहाय्यक निरीक्षकाचा काय हेतू होता हा प्रश्न आहे. या प्रकरणात ज्यांनी बेजबाबदारपणा दाखवला आहे, त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे.
(नक्की वाचा- पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी, न्यायालयाचा मोठा निर्णय)
अपघातावेळी कार ड्रायव्हर चालवत होता का?
अपघात झाला त्यावेळी कारमध्ये चौघेजणं होतं. अल्पवयीन आरोपी, ड्रायव्हर आणि त्याचे दोन मित्र. सुरुवातीला ड्रायव्हर कार चालवत असल्याचा जबाब दिला होता. या प्रकरणात त्याच्यावर कोणी दबाव आणला का, याचाही तपास पुणे पोलिसांकडून घेतला जात आहे. याशिवाय आरोपीचे दोन मित्र यांनीही अपघातावेळी कार ड्रायव्हर चालवत असल्याचं सांगितलं होतं. मात्र अपघातावेळी अल्पवयीन मुलगा कार चालवत असल्याचे पुणे पोलिसांकडून सांगितलं जात आहे.