जाहिरात
Story ProgressBack

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी, न्यायालयाचा मोठा निर्णय

अल्पवयीन आरोपीची बाल हक्क न्यायालयाच्या आदेशानुसार बालसुधारगृहात रवानगी केली आहे.

Read Time: 2 mins
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी, न्यायालयाचा मोठा निर्णय

पुण्यात भरधाव वेगानं पोर्शे कार चालवून दोन जणांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीली बाल हक्क न्यायालयाने दणका दिला आहे. अपघाताच्या घटनेनंतर आरोपीला अवघ्या 15 तासांत जामीन मिळाला होता. बुधवारी अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. आरोपी अज्ञान आहे की सज्ञान हे पोलीस तपासानंतर ठरवलं जाणार आहे. बाल हक्क न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

केवळ एका सहीवर जामीन 

याआधी अपघाताच्या सुनावणीच्या नोटीसीवर फक्त एकच स्वाक्षरी होती, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे हा निकाल ग्राह्य धरला जाऊ नये, अशी याचिका पुणे पोलिसांनी केली होती. ती मान्य करून हा निर्णय अवैध ठरवण्यात आलेला असून पुन्हा नव्याने या केसवर सुनावणी झाली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, निकालाच्या प्रतीवर बाल न्याय मंडळाचे सदस्य डॉ. एल.एन. धनवडे यांची स्वाक्षरी आहे. मात्र बाल न्याय मंडळाचे दुसरे सदस्य के.टी. थोरात यांच्या नावासमोर सही नाही. न्यायदंडाधिकारींच्या सहीचा रकानाही रिक्त आहे.

( नक्की वाचा : पबमध्ये 48 हजार उडवले, मुलाच्या आजोबांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन; पुणे अपघात प्रकरणात धक्कादायक अपडेट )

पोर्शे कार अपघातात अल्पवयीन आरोपीला पहिल्याच दिवशी अटक केली होती. त्यानंतर बाल न्याय बोर्डाने त्याला शिक्षा सुनावली होती. ज्यामध्ये 'अपघात'या विषयावर 300 शब्दाचा निबंध, वाहतूक पोलिसांसोबत 15 दिवस काम अशी शिक्षा देण्यात आली होती. या निकालाचा पोलिसांनाही धक्का बसला. 

( नक्की वाचा : रात्रभर पबमध्ये दारु ढोसली आणि पोर्शे कार चालवली, पुण्यात 2 जणांना उडवणाऱ्या तरुणाचं CCTV फुटेज उघड )

आरोपीच्या वडिलांनाही पोलीस कोठडी

अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवालला पुणे सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे सत्र न्यायालयानं विशालला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे पोलिसांनी विशालला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली होती. आरोपी छत्रपती संभाजीनगरमध्ये लपला होता. त्याने आणखी काही पुरावे लपवल्याचा संशय आहे, अन्यथा त्याला लपून बसण्याचं कोणतंही कारण नव्हतं, असा युक्तीवाद पुणे पोलिसांच्या वकिलांनी कोर्टात केला. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज दुपारी वाहतूक राहणार बंद, गॅन्ट्री बसवण्यासाठी ब्लॉक
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी, न्यायालयाचा मोठा निर्णय
infrastructure boom-in mumbai -making-it-a-livable-city
Next Article
मुंबईचा वेगवान विकास आणि सुखी जीवनमानासंदर्भात सांगोपांग चर्चा, चर्चासत्रात महापालिका आयुक्तांचाही सहभाग
;