पुणे पोर्शे अपघात प्रकरणात; अग्रवाल कुटुंबाचा माज कायम! जेलमधून बाहेर आल्यानंतरचा संतापजनक VIDEO व्हायरल

Pune Porsche Case: पुण्यातील बहुचर्चित आणि थरारक 'पोर्शे कार अपघात' प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल अग्रवाल आणि त्याचे कुटुंब पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अजिंक्य धायगुडे, पुणे

Pune Porsche Crash Case: पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या हायप्रोफाइल पोर्शे कार अपघात प्रकरणाने संपूर्ण देश ढवळून निघाला होता. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल आणि त्यांच्या पत्नीची  महिन्याभरापूर्वीच कोर्टाने जामिनावर सुटका केली होती. मात्र, तुरुंगातून बाहेर येताच अग्रवाल कुटुंबाने सर्व नियम आणि नैतिकतेला केराची टोपली दाखवत एक जंगी पार्टी साजरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या पार्टीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, नेटीझन्सकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

'मुंबई से आया मेरा दोस्त...' गाण्यावर थिरकले कुटुंब

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये अग्रवाल कुटुंबाचा मस्तवालपणा आणि पैशांचे प्रदर्शन पुन्हा एकदा उघडपणे पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये मुख्य आरोपी विशाल अग्रवाल हा आपल्या पत्नीसह चक्क गळ्यात नोटांचे मोठे हार घालून डान्स करताना दिसत आहे. "मुंबई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो..." या प्रसिद्ध बॉलीवूड गाण्यावर संपूर्ण अग्रवाल कुटुंब एकत्र येऊन जल्लोष करत नाचताना दिसत आहे.

Advertisement

VIDEO

(नक्की वाचा-  Pune Jamavbandi: पुण्यात आज रात्रीपासून 14 दिवस जमावबंदी लागू! महापालिकेकडून गाईडलाईन्सही जारी)

जेलवारी घडूनही माज कायम

काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने विशाल अग्रवाल याला अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला होता. दोन निष्पाप आयटी इंजिनिअर्सचा जीव घेणाऱ्या या गंभीर अपघातानंतर अग्रवाल कुटुंबाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले होते. मात्र, इतकी मोठी जेलवारी घडूनही आणि संपूर्ण देशात बदनामी होऊनही या कुटुंबाच्या वर्तनात कोणताही बदल झालेला नाही, हेच या व्हिडिओवरून स्पष्ट होत आहे.

(नक्की वाचा-  Mumbai-Pune: मुंबई-पुणे अंतर आता अवघ्या दीड तासांवर! 'ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे'वरून प्रवास होणार सुसाट)

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, "अपघातातील पीडितांच्या कुटुंबियांना अद्याप न्याय मिळालेला नसताना, आरोपी कुटुंब मात्र पैशांच्या जोरावर अशा प्रकारे उघडपणे जल्लोष कसा करू शकते?" असा संतप्त सवाल नागरी सोशल मीडियावर विचारत आहेत. या वादग्रस्त पार्टीमुळे अग्रवाल कुटुंबाच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
 

Topics mentioned in this article