जाहिरात

Pune Porshe Case : आधी निबंध, आता धडे! RTO कडून अल्पवयीन आरोपीला रोड सेफ्टी प्रोग्राम ट्रेनिंग

Pune Kalyaninagar Accident Case : अल्पवयीन आरोपीला शिक्षा म्हणून 300 शब्दांचा निबंध लिहिण्यासोबत तसेच वाहतूक नियमांचा अभ्यास करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयासोबत काम करण्याच्या अटी-शर्तीवर जामीन दिला होता. 

Pune Porshe Case : आधी निबंध, आता धडे! RTO कडून अल्पवयीन आरोपीला रोड सेफ्टी प्रोग्राम ट्रेनिंग

रेवती हिंगवे, पुणे

पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीला आरटीओने रोड सेफ्टी प्रोग्राम ट्रेनिंगचे धडे दिले आहेत. वाहतुकीची नियमावली, वाहन चालवताना काय काळजी घ्यायची, आरटीओकडून कशी कारवाई केली जाते या सारख्या अनेक गोष्टींची माहिती आरटीओने आरोपीला दिली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

अल्पवयीन आरोपीला धडे देताना प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली. अल्पवयीन आरोपीला शिक्षा म्हणून 300 शब्दांचा निबंध लिहिण्यासोबत तसेच वाहतूक नियमांचा अभ्यास करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयासोबत काम करण्याच्या अटी-शर्तीवर जामीन दिला होता. 

(नक्की वाचा - महायुतीत फूट? भाजपकडून काळे झेंडे तर शिंदे गटाचा बहिष्कार; मित्रपक्ष अजित पवारांवर नाराज का?)

निबंधात काय लिहिलं होतं?

हिट अँड रन प्रकरणानंतर तब्बल 47 दिवसांनी अल्पवयीन आरोपीने 300 शब्दांचा निबंध बालहक्क मंडळाकडं सादर केला होता. या निबंधामध्ये त्यानं प्रत्येकानं सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पाळण्याचं महत्त्व सांगितलं होतं.  या अपघातानंतर तो घाबरला होता. भीतीमुळे पोलिसांना माहिती दिली नाही, असं त्यानं या निबंधात लिहलं आहे. लोकांनी वाहतूक नियमांचं पालन केलं पाहिजे. अपघात झाला तर घटनास्थळावरुन पळून न जाता थेट जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जावं. पळून जाणं त्यांना अडचणीत आणू शकतं, असंही त्यानं निबंधात लिहलं होतं. त्याचबरोबर अपघातग्रस्तांना मदत करावी, असं आवाहनही त्यानं केलं. 

(नक्की वाचा- Kolkata Doctor Case : 'एका रात्रीत आमचं सगळं संपलं", पीडित डॉक्टर तरुणीच्या आई-वडिलांचा आक्रोश)

काय आहे प्रकरण?

कल्याणीनगर येथे 19 मे रोजी मध्यरात्री बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने पोर्शे कार 200 किमी प्रतितास वेगाने चालवत एका दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत दुचाकीवरील अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा जागीच मृत्यू झाला होता. धडक इतकी भयानक होती की अश्विनी आणि अनिश हवेत उडाले आणि खाली पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. संतप्त जमावाने मुलाला पकडलं तेव्हा तो नशेत वाटत होता. त्याला लोकांनी मारहाण देखील केली.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
Walk : अतिरिक्त चरबी अन् आजारांना म्हणा बाय बाय, 30 दिवसांचा प्रभावी Walking Plan!
Pune Porshe Case : आधी निबंध, आता धडे! RTO कडून अल्पवयीन आरोपीला रोड सेफ्टी प्रोग्राम ट्रेनिंग
CIDCO Navi mumbai  Lottery CIDCO New Lottery Announcement, Why Buy a CIDCO Home
Next Article
सिडकोचेच घर का खरेदी कराल? नव्या लॉटरीत 'ही' आहे खास गोष्ट