Pune Rain - पावसाने 86 वर्षांचा रेकॉर्ड मोडला, पुण्यात पावसाचा नवा विक्रम

पावसाचा तडाखा मुंबई, ठाणे, पुणे, रायगड या भागांना सर्वाधिक बसला होता. या पावसाने पुण्यातील रेकॉर्ड मोडलेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

राहुल कुलकर्णी

बुधवारी महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडला. या पावसाचा तडाखा मुंबई, ठाणे, पुणे, रायगड या भागांना सर्वाधिक बसला होता. या पावसाने पुण्यातील रेकॉर्ड मोडलेत. शिवाजीनगर भागात पावसाने गेल्या 86 वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितानुसार शिवाजीनगरमध्ये 24 तासांत 133 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. महत्वाची बाब ही आहे की यातील 124 मिलीमीटर पाऊस हा 2.30 ते संध्याकाळी 5.30 या 3 तासांत झाला होता. बुधवारी सकाळी 8.30 वाजल्यापासून गुरुवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत शिवाजीनगर भागात तब्बल 133 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

नक्की वाचा: इस्त्री करताना वीज गेली, मुलाला शाळेत सोडायची घाई; घरी परतली अन् महिलेच्या संसाराची 'राखरांगोळी' 

पुण्यात अतिवृष्टी

पुण्यामध्ये गुरुवारी झालेला पाऊस हा सामान्य पाऊस नव्हता तर ती अतिवृष्टी होती असं म्हटलं आहे. पावसाने पुण्यातील विक्रम मोडण्याचे मुख्य कारण हे अतिवृष्टी ठरलं आहे. सप्टेंबर महिन्यात हवामानातील बदलांमुळे पावसाचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून आले आहे.  आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने आणि कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मुसळधार पाऊस पडला आहे. बुधवारीदेखील हीच परिस्थिती पाहायला मिळाली.  पुढच्या काही दिवसांत पुन्हा अशाच पद्धतीने पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही असे देखील हवामान खात्याचे म्हणणे आहे. 

नक्की वाचा : मुसळधार पावसामुळे मुंबईची वाहतूक मंदावली, पाहा 10 VIDEO

पावसाचा रेकॉर्ड काय होता ?

सप्टेंबर महिन्यात 24 तासांत झालेल्या पावसाचा विक्रम यापूर्वी 1938 साली नोंदवण्यात आला होता. त्यावर्षी 24 तासांत  132.3 मिमी पाऊस झाला होता. सप्टेंबर 2024 मध्ये 24 तासांत 133 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. 

Topics mentioned in this article