जाहिरात

Pune : इस्त्री करताना वीज गेली, मुलाला शाळेत सोडायची घाई; घरी परतली अन् महिलेच्या संसाराची 'राखरांगोळी' 

Pune News : घरी परतल्यावर ते दृश्य पाहून महिलेला धक्काच बसला.

Pune : इस्त्री करताना वीज गेली, मुलाला शाळेत सोडायची घाई; घरी परतली अन् महिलेच्या संसाराची 'राखरांगोळी' 
पुणे:

मुलाला शाळेत सोडताना घाईघाईने इस्त्री बंद करायचं विसरलेल्या महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील रावेतमधून समोर आली आहे. सकाळी मुलाला शाळेत सोडण्यासाठी उशीर होत होता. कपड्यांना इस्त्रीही करायची होती. त्यात वीज गेली. त्यामुळे ऐनवेळी उद्भवलेल्या अनेक प्रसंगांना तोंड देताना महिलेकडून एक गोष्ट राहून गेली आणि त्याचा परिणाम म्हणजे तिच्या राहत्या घरातील वस्तू जळून खाक झाल्या.

नेमकं काय चुकलं?
मिळालेल्या माहितीनुसार,  25 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पिंपरी चिंचवड भोंडवे बाग रावेत इथं ही घटना घडली. महिला घरात कपडे इस्त्री करत असताना अचानक वीज गेली. मुलाला शाळेत नेण्याची वेळ असल्याने त्या घाईघाईत घराबाहेर पडल्या. इस्त्री बंद करायला विसरल्या. मुलाला शाळेत सोडल्यानंतर परत आल्या तेव्हा त्यांचं घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले दिसले. त्यानंतर अग्निशमन दलाला फोन करण्यात आला. पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाच्या प्राधिकरण सबस्टेशनला सकाळी दहाच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत घराला लागलेली आग विझवली. 

अख्ख्या बदलापुरात अक्षय शिंदेच्या मृतदेहाला जमीन मिळेना, वडिलांची पोलिसात धाव

नक्की वाचा - अख्ख्या बदलापुरात अक्षय शिंदेच्या मृतदेहाला जमीन मिळेना, वडिलांची पोलिसात धाव

पाहणी केली असता महिलेच्या बेडरूममधील सर्व सामान जळून खाक झाल्याचं दिसून आलं. वीज खंडित होत असताना लोखंड शिल्लक राहिल्याचे तपासात उघड झाले. त्यामुळे वीज पूर्ववत झाल्यानंतर आग लागली असावी. महिलेने तिचा मोबाईल फोन चार्जिंगला बेडरूममध्ये सोडला होता. त्याचाही स्फोट झाला. त्यामुळे आग पसरली असावी. या आगीत पलंग, गाद्या, उशा, ब्लँकेट, इस्त्री, मोबाईल फोन, विजेच्या तारा, बोर्ड, पंखे असे अनेक साहित्य जळून खाक झाले.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com