Pune Rains: पुण्यात पावसाची संततधार; चारही धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ

Pune Dam Water Level : पुणे जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे चारही धरणांमध्ये पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune Dam Water Level : पुणे जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यातील धरण साखळी क्षेत्रात पावसाची संततधार सुरुच आहे. धरण साखळी क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. 

पुणे जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे चारही धरणांमध्ये पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. खडकवासला धरण क्षेत्रात  समाधानकारक जलसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या महिन्यात पाणीसाठा जास्त प्रमाणात आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Rain Update : पुणे, मुंबईत धुमशान; विदर्भातही मुसळधार पावसाचे संकेत)

पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये किती जलसाठा ?

  1. खडकवासला: 63.60 टक्के
  2. पानशेतः 34.07 टक्के
  3. वरसगावः 42.99 टक्के
  4. टेमघर: 23.68 टक्के

>> चारही धरणात एकूण पाणीसाठा : 38.67 टक्के

>> मागच्या वर्षी आजच्या दिवशीचा पाणीसाठा: 12.32 टक्के

नक्की वाचा - Mumbai Rain: 24 ते 28 जून दरम्यान सलग 5 दिवस मोठी भरती, पावसाळ्यात 19 वेळा येणार मोठी भरती !

Advertisement

नाशिकमध्ये विक्रमी पाऊस

नाशिक शहरात जून महिन्यात गेल्या 23 दिवसात 315 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने 2017 सालचा उच्चांक मोडीत काढला आहे. विशेष म्हणजे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात देखील मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्याचा धरणसाठा 43 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. दारणा, गंगापूर यासोबतच कादवा धरणातून तीन दिवसांपासून विसर्ग सुरू असून यात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येते आहे. गंगापूर धरणातून रात्री पाण्याचा विसर्ग 6160 एवढा करण्यात आल्याने रामकुंड परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पुराची ओळख म्हणून समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी येऊन पोहोचले आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article