
मुंबईत रात्री पासून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. पुढील दोन दिवस मुंबईत असाच पाऊस कायम राहणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. मुंबई, ठाणे, पालघर कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे (घाट परिसर), रायगड, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोकणाच्या तुलनेत विदर्भात अपेक्षित पाऊस झालेला नाही. पुढील पाच दिवस कोकणासह विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईत ठाणे आणि पालघर या जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील भागांमध्ये पुढील दोन दिवस जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा - Mumbai Rain: 24 ते 28 जून दरम्यान सलग 5 दिवस मोठी भरती, पावसाळ्यात 19 वेळा येणार मोठी भरती !
नागपुरातही मुसळधार पावसाची शक्यता...
नागपूर आणि आसपासच्या भागात आज मुसळधार पाऊस येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने अंदाज वर्तविण्यात आला आहे. आज विदर्भात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात बहुधा सर्वत्र आणि उर्वरित विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 24 ते 27 जून दरम्यान नागपूरसह कित्येक ठिकाणी जोराचे वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस येण्याची शक्यता आहे. तीन ते चार दिवस सातत्याने पाऊस येण्याचा अंदाज असून खोलगट भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्यातील धरण साखळी क्षेत्रात रिमझिम पाऊस..
पुण्यातील धरण साखळी क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे पाणी साठ्यात वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे चारही धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ झाली असून समाधानकारक जलसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिलेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या महिन्यात अधिक पाण्याची साठवणूक झाली आहे.
पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये किती जलसाठा ?
खडकवासला: 63.60 टक्के
पानशेतः 34.07 टक्के
वरसगावः 42.99 टक्के
टेमघर: 23.68 टक्के
चार ही धरणात एकूण धरण साठा: 38.67 टक्के
मागच्या वर्षी आजच्या दिवशीचा पाणीसाठा: 12.32 टक्के
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world