जाहिरात

Pune Success Story: भन्नाट! एकाच खोलीत राहायचे, मेहनत करायचे, आतासर्वच जण झाले मोठे अधिकारी

या संपूर्ण यशामध्ये रूममेट मित्रांची साथ त्यांना मिळाली.

Pune Success Story: भन्नाट! एकाच खोलीत राहायचे, मेहनत करायचे, आतासर्वच जण झाले मोठे अधिकारी
पुणे:
Inspirational story: अधिकारी होण्याचं स्वप्न घेवून गावाकडून अनेक तरूण शहात येतात. कुणी मुंबईत येतं तर कुणी पुण्यात येवून स्पर्धा परिक्षांची तयारी करतं. अशा वेळी अनेक मित्र मिळतात. अनेक जण रुममेट बनतात. पण एकाच रूममध्ये राहाणारे सर्वच जण अधिकारी झाले तर? ही तशी दुर्मिळ घटना मानली पाहीजे. पण तशी घटना घडली आहे. पुण्यात स्पर्धा परिक्षेसाठी एकाच रूममध्ये राहणारे आता सर्वच जण अधिकारी झाले आहे. जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन असेल तर हे शक्य आहे. 

कराडच्या सूरज पडवळ यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. यापूर्वी राज्य कर विभागात State Tax Inspector (STI) म्हणून कार्यरत असलेल्या सूरज यांनी आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC राज्यसेवा परीक्षेत थेट Class-I Officer (SST) पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या यशाने कराड आणि पुणे परिसरात आनंदाचे वातावरण आहे. सूरज यांच्या यशामागे त्यांच्या मेहनतीसह त्यांचे पुण्यात तयारी करणारे रूममेट मित्र महत्त्वाचे ठरले आहेत. त्यांचे अनेक मित्र यापूर्वीच सरकारी अधिकारी म्हणून कार्यरत झाले होते. त्या मित्रांच्या यादीत आता सूरजचा ही समावेश झाला आहे. त्यामुळे ज्या रूममध्ये ते राहात होते ते आता सर्वच जण सरकारी अधिकारी झाले आहेत हे विशेष. 

नक्की वाचा - Government Holiday: 2026 च्या सरकारी सुट्ट्या जाहीर, किती सुट्ट्या झाल्या कमी? पाहा संपूर्ण लिस्ट

या संपूर्ण यशामध्ये रूममेट मित्रांची साथ त्यांना मिळाली. त्यांनी दिलेले प्रोत्साहन महत्वाचे ठरले. सूरज यांच्यासोबत प्रसाद चौगुले, राकेश गीते, अनिकेत साखरे, सुरज गाढवे, निलेश खाडे, संकेत देसाई हे सर्वजण एकारूममध्ये पुण्यात राहात होते. या सर्वांनी आपापल्या परिक्षा पास केल्या. पण त्यांनी सतत मला तू अधिक चांगली कामगिरी करू शकतो. प्रयत्न करत रहा असा सल्ला दिला होता. त्यामुळे त्यांचा सल्ला मानला आणि क्लासवन अधिकारी झालो असं सूरज सांगतात. 

नक्की वाचा - Pune News: घराची किंमत 90 लाख पण मिळणार 28 लाखात, कुठे अन् कसा करायचा अर्ज?

MPSC चा निकाल लागल्यानंतर पुण्यातील या रूममेट ग्रुपची कहाणी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यातील  सूरज हा आधी यश मिळूनही नंतर थांबला नाही. मित्रांमुळे त्याने क्लासवन होण्याचा निर्णय घेतला. मेहनत आणि जिद्द्याच्या जोरावर त्यांना त्यात यशही मिळवले. त्यांचे संपूर्ण शिक्षण कराडमध्येच पूर्ण झाले. वडील निवृत्त शिक्षक आहेत. तर  आई गृहिणी आहे. बहीणही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. कुटुंबाने दिलेला मानसिक आधार आणि मित्रांची मिळालेली साथ यामुळे त्यांनी या यशाला गवसणी घातली आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com