जाहिरात

Pune News : कारला स्पर्शही करीत नाही, हायटेक चोरांमुळे पुणेकरांचं टेन्शन वाढलं; काय काळजी घ्याल?

अनेक ठिकाणी चोरट्यांनी हॅक करुन गाड्यांची चोरी केल्याचं समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांसमोर हायटेक चोरांचं मोठं आव्हान उभं आहे.

Pune News : कारला स्पर्शही करीत नाही, हायटेक चोरांमुळे पुणेकरांचं टेन्शन वाढलं; काय काळजी घ्याल?

Pune News :  चारचाकी वाहनांमध्ये नवनवे तंत्रज्ञान येत आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने कार पळविणं आता शक्य होत नाही. दरम्यान पुण्यातील चोरटेदेखील हायटेक झाल्याचं समोर आलं आहे. अनेक ठिकाणी चोरट्यांनी हॅक करुन गाड्यांची चोरी केल्याचं समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांसमोर हायटेक चोरांचं मोठं आव्हान उभं आहे. (Hi-tech car theft in Pune)

कशी होते हायटेक कारचोरी...

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली, चीनच्या बाजारपेठेतील ओबीडी डिव्हाइस, रिलेबॉक्सचा वापर कार चोरीसाठी केला जात असल्याचं समोर आलं आहे. या किटच्या मदतीने कारचा इंजिन कोड स्कॅन करुन लॅपटॉपच्या साहय्याने एक विशिष्ट सॉफ्टवेअरच्या मदतीने कारच्या इलेक्ट्ऱनिक सिस्टिममध्ये एन्ट्री घेतली जाते. ही ओबीडी डिव्हाइस कारला कनेक्ट केलं जातं आणि त्यानंतर कारचे सेन्सर, जीपीएस बंद करुन चोरी केली जाते. 

नक्की वाचा - Pune News : MPSC मध्ये अपयश, तरीही 18 महिन्यात 13 लाखांचं कर्ज फेडलं; तरुणाची अवाक् करणारी कामगिरी

स्वत:च्या कारची काळजी कशी घ्याल? 

गाडी पार्क करताना अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अनधिकृत ठिकाणी गाडी पार्क करुन नये. गाडी बंद केल्यानंतर हँडब्रेक लावायला विसरू नये. मॅन्यूअल कार असेल उतार असल्यास पहिल्या गिअर आणि चढाव असल्यास रिव्हर्स गिअरमध्ये गाडी ठेवा. गाडीतून उतरताना सर्व खिडक्या बंद केल्या आहेत की नाही हे तपासून पाहा. गाडी लॉक करायचं विसरू नये. 


पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान...

अत्याधुनिक वाहनांमध्ये सेन्सर लॉक, स्मार्ट की आणि इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट आणि पोर्ट असतं. याचा गैरवापर करुन चोरटे वाहन सुरू करू शकतात. 


 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com