Pune News: अंडरग्राउंट मेट्रोच्या वर बोअर मारल्याचा प्रकार; महामेट्रोचं मोठं नुकसान, गुन्हा दाखल

Pune Metro News: पुण्यात शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यान धावणाऱ्या भूमिगत मेट्रोच्या बोगद्यावर एका व्यक्तीने बोरवेल मारून छिद्र पाडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

यशपाल सोनकांबळे, पुणे

पुण्यातील भूमिगत मेट्रोच्या सुरक्षेबाबत एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. शहरातील शुक्रवार पेठ परिसरात एका नागरिकाने आपल्या राहत्या घरात थेट भूमिगत मेट्रोच्या बोगद्यावर बोरवेल मारल्याची घटना उघडकीस आली. या नागरिकाच्या निष्काळजीपणामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे.  बोरवेल मारताना थेट मेट्रोच्या बोगद्याचे काँक्रीट फोडून खाली छिद्र पाडले आहे. यामुळे मेट्रो प्रशासनाची मोठी धावपळ उडाली आहे.

काय आहे नेमका प्रकार?

खडक पोलीस स्टेशनच्या अगदी समोर असलेल्या शुक्रवार पेठेतील एका घरात हा प्रकार घडला. धनंजय मोठे असे या इसमाचे नाव असून, त्याच्या घराच्या खालून भूमिगत मेट्रो शिवाजीनगरकडून स्वारगेटच्या दिशेने जाते. आपल्या जमिनीच्या खालून मेट्रोचा बोगदा गेला आहे, हे माहीत असतानाही मोठे याने तिथे बोअरिंग मारण्याचे काम सुरू केले. ड्रिलिंग मशीन थेट मेट्रोच्या बोगद्याच्या छताला छेदून आतपर्यंत पोहोचले.

Advertisement

(नक्की वाचा-  Ashok Kharat: नवऱ्याला बाहेर बसवून गर्भवती पत्नीला कॅबिनमध्ये बोलावलं अन्... अशोक खरातचं संतापजनक कृत्य)

महामेट्रोच्या मालमत्तेचे नुकसान

या कृतीमुळे महाराष्ट्र राज्य सरकार आणि पुणे महामेट्रोच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. मेट्रोच्या बोगद्याची मजबुती आणि सुरक्षितता यामुळे धोक्यात आली आहे. सुदैवाने, या ड्रिलिंगच्या वेळी बोगद्यातून मेट्रो धावत नव्हती, अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता.

(नक्की वाचा-  VIDEO: लोणावळ्यात जात असाल तर सावधान! पर्यटक कुटुंबासोबत भयंकर घडलं)

या गंभीर प्रकारानंतर महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी तातडीने खडक पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. धनंजय मोठे आणि बोरवेलचे काम करणारा अज्ञात ठेकेदार जगताप या दोघांविरोधात खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे आणि सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणे या कलमान्वये कारवाई करण्यात येत आहे.
 

Topics mentioned in this article