मद्यधुंद अवस्थेत बीएमडब्लू चालकाने भररस्त्यात अश्लील कृत्य केल्याचा प्रकार पुण्यातील येरवडा परिसरातून समोर आला होता. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यांतर संताप व्यक्त केला जात होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी अश्लील कृत्य करणाऱ्या तरुणांचा शोध सुरु केला. अखेर गौरव आहुजा या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो गायब झाला होता. त्यानंतर त्याचा माफीनाम्याचा व्हिडीओ समोर आला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
घटनेनंतर गौरव आहुजाने कराडमध्ये सरेंडर केलं. त्यानंतर त्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर त्याच्या मित्राला म्हणजेच भाग्येश ओसवालला पुणे पोलिसांनी रात्री 11 वाजता अटक केली. दोघांचीही सकाळी ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी झाली. तर आज दुपारी पुणे पोलीस गौरव आहुजा याला करणार कोर्टात हजर करणार आहेत.
काय आहे प्रकरण?
गौरव आणि त्याचा मित्र भाग्येश दोघेही मद्यधुंदावस्थेत होते. सकाळच्या सुमारास तरुणाचा सिग्नलवर अश्लीलपणा एकानं मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला होता. धक्कादायक बाब म्हणजे लोकांनी हटकल्यानंतरही या तरुणाने उर्मटपणा केला. त्यानंतर फुल स्पीडमध्ये गाडी चालवत वाघोलीच्या दिशेने त्याने पळ काढला. त्याचं हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं होतं. त्यानंतर त्याचा हा व्हिडीओ वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि काही तासातच आहुजाची मस्ती उतरली.
आधी मस्ती, मग माफीमाना
गौरव आहुजाच्या वडिलांविरुद्धही काही गुन्हे असल्याचं समोर आलं आहे. गौरवच्या कृत्यानंतर त्याच्या वडिलांनी दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली. त्यानंतर गौरवने देखील व्हिडीओद्वारे माफी मागितली. "मी गौरव आहुजा, माझ्याकडून पब्लिकमध्ये जे कृत्य झालं होतं ते खूप चुकीचं होतं. संपूर्ण जनता पोलीस डिपार्टमेंट आणि शिंदे साहेबांची मी माफी मागतो. मला एक चान्स द्या, सॉरी. माझ्या कुठल्याही फॅमिली मेंबरला त्रास देऊ नका. पुढच्या आठ तासात मी येरवडा पोलीस ठाण्यात सरेंडर होईल,” असं गौरवने म्हटलं होतं.