जाहिरात

Pune News : पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट, सोमवारपासून लागू होणार नवे वेळापत्रक, 'या' गोष्टींवर निर्बंध!

Pune Water Crisis: भविष्यातील पाण्याची भीषण टंचाई टाळण्यासाठी महापालिकेला हा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे.

Pune News : पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट, सोमवारपासून लागू होणार नवे वेळापत्रक, 'या' गोष्टींवर निर्बंध!
Pune Water Crisis: पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि काळजीची बातमी आहे.
पुणे:

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Pune Water Crisis: पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि काळजीची बातमी आहे. पुणे शहराची तहान भागवणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट झाल्यामुळे आता शहरावर पाणी कपातीचे संकट ओढवले आहे. येत्या सोमवारपासून संपूर्ण पुणे शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा मोठा निर्णय पुणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी ही घोषणा केली आहे. 

यंदा अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने धरण परिसरातील पाणीसाठा झपाट्याने खाली गेला आहे. त्यामुळे भविष्यातील पाण्याची भीषण टंचाई टाळण्यासाठी आणि उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी महापालिकेला हा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे. या नव्या निर्णयामुळे आता पुणेकरांना पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरावा लागणार आहे.

का करावी लागली कपात?

पुणे शहराला प्रामुख्याने खडकवासला धरण समूहातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमालीचे कमी राहिल्यामुळे या धरणांमध्ये हवा तितका पाणीसाठा जमा होऊ शकलेला नाही. पुणे शहराचा विचार केला तर शहरासाठी दरमहा सुमारे 1.6 टीएमसी पाण्याचा वापर केला जातो. 

सध्याची परिस्थिती पाहता खडकवासला धरण समूहातून होणारा हा पाणीपुरवठा सुरू ठेवणे कठीण झाले आहे. धरणातील हाच घटलेला पाणीसाठा लक्षात घेऊन महापालिकेने पाणी कपातीचे पाऊल उचलले आहे. महापालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाण्याचा अत्यंत काटकसरीने आणि योग्य तोच वापर करावा.

( नक्की वाचा : Kharif Crop Planning: अल निनोच्या संकटात शेती वाचवणार 'हा' फॉर्म्युला; यंदाच्या खरिपात 'या' पिकांची करा निवड )

वॉशिंग सेंटर्स आणि स्विमिंग पूलवर निर्बंध?

शहरातील या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आता आणखी काही कडक पावले उचलण्याच्या तयारीत आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यासाठी व्यावसायिक कारणांसाठी होणारा पाण्याचा अपव्यय टाळला जाणार आहे. यामध्ये शहरातील वाहने धुण्याची वॉशिंग सेंटर्स, स्विमिंग पूल तसेच मोठ्या प्रमाणावर सुरू असणाऱ्या बांधकामांसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यावर कडक निर्बंध घालण्याचा विचार महापालिका प्रशासन करत आहे. 

नागरिकांना या नवीन पाणी कपातीच्या वेळापत्रकानुसार स्वतःची पूर्वतयारी करता यावी, यासाठी प्रशासनाकडून 1 आठवड्याचा कालावधी देण्यात आला आहे.

( नक्की वाचा : Monsoon Prediction निसर्गाची अद्भूत शक्ती! 'या' पक्ष्याच्या अंड्यांवरून ठरतो मान्सूनचा काळ; वाचा काय आहे पद्धत )

कधी होणार अंमलबजावणी?

पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी यांनी सांगितलं की, सध्या तांत्रिक कारणांमुळे शहर आणि उपनगरांमध्ये काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून पुढील आठवड्यापासून या एक दिवसाआड पाणी कपातीचा निर्णय पूर्णपणे अंमलात आणला जाईल. पाणी नियोजनाबाबत जलसंपदा विभागाशी देखील सविस्तर चर्चा केली जाणार असून त्यानंतरच अंतिम आराखडा स्पष्ट होईल. मात्र, तोपर्यंत नागरिकांनी पाण्याचा अपव्यय पूर्णपणे थांबवावा, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com