जाहिरात

Monsoon Prediction निसर्गाची अद्भूत शक्ती! 'या' पक्ष्याच्या अंड्यांवरून ठरतो मान्सूनचा काळ; वाचा काय आहे पद्धत

Lapwing bird monsoon prediction : हवामान खात्याचे मोठे सॅटेलाइट, कोट्यवधी रुपयांची यंत्रणा आणि शास्त्रज्ञांचे अंदाज अनेकदा चुकतात, पण निसर्गाच्या कुशीत राहणारा एक छोटासा पक्षी ही माहिती अचूक देतो.

Monsoon Prediction निसर्गाची अद्भूत शक्ती! 'या' पक्ष्याच्या अंड्यांवरून ठरतो मान्सूनचा काळ; वाचा काय आहे पद्धत
Lapwing bird monsoon prediction : ग्रामीण भागात या पक्ष्याला निसर्गाचा हवामान तज्ज्ञ मानले जाते.
मुंबई:


Lapwing bird monsoon prediction : हवामान खात्याचे मोठे सॅटेलाइट, कोट्यवधी रुपयांची यंत्रणा आणि शास्त्रज्ञांचे अंदाज अनेकदा चुकतात, पण निसर्गाच्या कुशीत राहणारा एक छोटासा पक्षी मान्सूनची अचूक माहिती देतो असे म्हटले तर? होय, हे पूर्णपणे खरे आहे. आधुनिक तंत्रज्ञान नसलेल्या काळात आपले पूर्वज ज्याच्या इशाऱ्यावर पावसाचा अंदाज लावायचे, तो रहस्यमयी पक्षी म्हणजे टिटवी. 

ग्रामीण भागात या पक्ष्याला निसर्गाचा हवामान तज्ज्ञ मानले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही या पक्ष्याने मान्सून येण्यापूर्वीच एक मोठा संकेत दिला आहे. या पक्ष्याचे वागणे आणि त्याने दिलेले संकेत पाहून, यंदा  पाऊस कसा होणार, याचा अंदाज गावकरी लावतात. एका छोट्याशा पक्ष्याकडे मान्सूनची माहिती देण्याची ही अद्भुत नैसर्गिक शक्ती आली कुठून, हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे.

निसर्गाचा हा चमत्कार आणि या पक्ष्याशी जोडलेली रंजक माहिती समजून घेण्यासाठी गावकऱ्यांचे अनुभव आणि विज्ञानाचा दृष्टिकोन पाहणे गरजेचे आहे.

( नक्की वाचा : भारताचा सातवा दरवाजा ते मेक्सिकोचे पाताल लोक; या 7 जागा उघडण्याचं धाडस कोणतंही सरकार का करत नाही? )
 

अंड्यांच्या संख्येवरून ठरतो पावसाचा काळ

टिटवी हा पक्षी मान्सून सुरू होण्यापूर्वी अंडी घालतो. ती किती अंडी देणार, यावर पावसाचे महिने अवलंबून असतात, अशी ग्रामीण भागात ठाम श्रद्धा आहे. अनेक ज्येष्ठ जाणकारांच्या अनुभवानुसार, टिटवीने जर 1 अंडा दिला तर 1 महिना पाऊस पडतो, 2 अंडी दिली तर 2 महीने, 3 अंडी दिली तर 3 महिने आणि जर 4 अंडी दिली तर पूर्ण 4 महिने मान्सूनचा दमदार पाऊस पडतो.

यंदा या पक्ष्याच्या अंड्यांच्या संख्येवरून सरासरी पावसाचे संकेत मिळत आहेत. पावसाची चिन्हे दिसताच, मग तो मोसमी असो वा अवकाळी, हा पक्षी संपूर्ण परिसरात चक्रा मारून मोठ्या आवाजात ओरडत मान्सूनचे जणू अधिकृत ऐलानच करतो.

( नक्की वाचा : Bermuda Triangle: बर्म्युडा ट्रँगलचं सर्वात मोठं गूढ उकललं? समुद्राच्या खाली शास्त्रज्ञांना सापडलं तरी काय? )
 

अंड्यांच्या जागेवरून कळतो मान्सूनचा नूर

टिटवी अंडी कुठे देणार, यावरही पावसाचा जोर कसा असेल हे ठरते. हा पक्षी कधीही झाडावर घरटे बांधत नाही, तर उघड्या शेतात किंवा जमिनीवरच अंडी घालतो. जर टिटवीने शेतामध्ये अगदी सखल भागात किंवा जमिनीच्या सपाट पातळीवर अंडी दिली, तर त्याचा अर्थ यंदा पाऊस सामान्य किंवा सरासरी स्वरूपाचा राहील असा होतो. 

याउलट, तिने आपली अंडी शेतातील उंचावरील भागात किंवा सुरक्षित उंचीवर दिली, तर त्याचा अर्थ त्या वर्षी 4 महिने अतिशय मुसळधार पाऊस पडणार असा लावला जातो. पुराच्या पाण्यापासून संरक्षण व्हावे म्हणूनच हा पक्षी उंचावर अंडी घालतो, असे मानले जाते.

पारस दगडाचे गूढ आणि विज्ञानाचा खुलासा

टिटवी पक्ष्याबाबत ग्रामीण भागात आणि लोककथांमध्ये आणखी एक अतिशय रंजक समज आहे. टिटवी आपली अंडी फोडण्यासाठी आणि त्यातून पिल्ले बाहेर काढण्यासाठी 'पारस दगडा'चा शोध घेते, अशी कथा सांगितली जाते. पारस दगड हा एक पौराणिक आणि जादुई दगड मानला जातो, ज्याच्या स्पर्शाने लोखंडाचेही सोने होते असे म्हटले जाते.

मात्र, विज्ञान या कथेला पूर्णपणे नाकारते. विज्ञानानुसार, जगात पारस दगड नावाची कोणतीही वस्तू अस्तित्वात नाही. टिटवी जमीन तयार करून उघड्यावर अंडी देते आणि इतर पक्ष्यांप्रमाणेच ती अंडी उबवून अगदी सामान्य पद्धतीने पिल्लांना जन्माला घालते. या पक्ष्याचा पारस दगडाशी कोणताही संबंध असल्याचा कोणताही वैज्ञानिक आधार संशोधनात आढळलेला नाही. असे असले तरी, निसर्गाचा समतोल राखण्यात आणि पावसाचा अंदाज देण्यात या पक्ष्याचे महत्त्व आजही टिकून आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com