देवा राखुंडे, पुणे
Pune ZP Result : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीवर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. अजित पवारांच्या निधनानंतर विशेषत: पुण्याच्या निकाल कसा असेल याची चर्चा सर्वाधिक होती. अजित पवार 9 फेब्रुवारीला कमबॅक करणार अशा आशयाचे रील्स देखील इन्स्टाग्रामवर व्हायरल होत होते.
जिल्हा परिषद निकालानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने अजितदादांची आठवण आहे. पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एकहाती सत्ता स्थापन केली आहे. पुणे जिल्हा परिषदेवर आतापर्यंत 40 जागा जिंकल्या आहेत. तर अजूनही 18 जागांचे निकाल येणे बाकी आहे.
जिल्हा परिषद 73 पैकी 55 जागांचे निकाल
- राष्ट्रवादी- 40
- भाजप- 7
- शिवसेना- 4
- शरद पवार गट - 1
- ठाकरे गट- 3
विजयी उमेदवारांची यादी
जुन्नर
- डिंगोरे: सोनाबाई दाभाडे: (राष्ट्रवादी)
- ओतूर : छाया तांबे (राष्ट्रवादी)
- बोरी बु. : कल्पना काळे (राष्ट्रवादी)
- आळे : मंगेश काकडे (शिवसेना)
- राजुरी: स्मिता कणसे (शिवसेना - शिंदे गट)
- सावरगाव : गुलाबराव पारखे (शिवसेना ठाकरे गट )
- बारव: मोनाली लांडे (राष्ट्रवादी)
- नारायण गाव : नेहा पाटे (शिवसेना)
आंबेगाव
- पारगाव तर्फे अवसरे : विवेक वळसे (राष्ट्रवादी)
- कळंब: प्रीती थोरात (राष्ट्रवादी शरद पवार)
- शिनोली: शीला लोहकरे (राष्ट्रवादी)
- अवसरी बु: विष्णु हिंगे (राष्ट्रवादी)
- घोडेगाव: सुवर्णा देविदास दरेकर ( शिवसेना)
शिरूर
- कवठे यामाई ; राजेंद्र गावडे ( भाजप)
- न्हावरा: वृषाली वाळके (राष्ट्रवादी)
- रांजणगाव गणपती: स्वाती पाचुंदकर (भाजप)
- मांडवगण फराटा: सुजाता पवार
खेड
- नाणेकर वाडी : गणेश बोत्रे (राष्ट्रवादी)
- कुरळी : विनया मुंगसे (शिवसेना ठाकरे गट )
- पाईट सुनिता बुट्टे पाटील (राष्ट्रवादी)
मावळ
- टाकवे बु: अनंता पावसे (राष्ट्रवादी)
- इंदूरी: पल्लवी दाभाडे (राष्ट्रवादी)
- खरकाळे : दीपाली हुलावले (राष्ट्रवादी)
- कुसगाव बु: संतोष राऊत (राष्ट्रवादी)
- सोमटणे: मनीषा मुरे (राष्ट्रवादी)
मुळशी
- पिरंगुट : आबा शेळके (शिवसेना उबाठा)
हवेली
- कोरेगाव मुळ: सुरेखा हरगुडे (राष्ट्रवादी)
- पेरणे: किरण साकोरे (भाजप)
दौंड
- खडकी : वीरधवल जगदाळे (राष्ट्रवादी)
- वरवंड : गायत्री खळदकर
- बोरी पार्धी : तुषार रमेश थोरात (राष्ट्रवादी)
पुरंदरे
- गराडे: रुपाली झेंडे (राष्ट्रवादी)
- बेलसर: अजय इंगळे (भाजप)
- वीर: हरीभाऊ लोळे: (भाजप)
- निरा शिवतक्रार: प्राजक्ता दुर्गाडे (राष्ट्रवादी)
वेल्हे
- विंझर: अमोल नलावडे (राष्ट्रवादी)
- वेल्हे बु : तानाजी मांगडे (राष्ट्रवादी)
भोर
- कामथडी- भोंगवली: विक्रम खुटवड (राष्ट्रवादी)
- भोलावडे: विठ्ठल आवाळे (भाजप)
बारामती
- सूपा: पल्लवी खेत्रे (राष्ट्रवादी)
- गुणवडी: शुभांगी शिंदे ( राष्ट्रवादी)
इंदापूर
- भिगवण: मेघना बंडगर (राष्ट्रवादी)
- निमगाव केतकी : सोनाली जाधव ( राष्ट्रवादी)