सूरज कसबे, प्रतिनिधी
Punekar vs Outsiders New Post Viral : विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात 'पुणेकर विरुद्ध बाहेरू आलेले'अशा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शैक्षणिक आणि आयटी हब असलेल्या पुण्याला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीचा वारसा लागला आहे.परंतु,सोशल मीडियावर 'पुणेकर विरुद्ध बाहेरू आलेले',अशा आशयाचे पोस्टर झळकल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मराठवाडा आणि विदर्भ अशा राज्यातील प्रांतातूनच आलेल्या मराठी लोकांना चुकीच्या पद्धतीनं टार्गेट केलं जात आहे. दिवाळी सुट्टीत जे लोक गावाकडे गेले, त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. चालले परत येऊ नका..शुभ दिपावली, असं म्हणत पुणेकरांनी त्या लोकांचा डिवचलं. पण आता नेमकं उलट घडलं आहे. एका तरुण भर रस्त्यात पोस्टर दाखवत लोकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं समोर आलंय. या पोस्टरमध्ये लिहिलंय, "जे लोक दिवळीत पुणे सोडून घरी जात आहेत.त्यांनी नक्कीच परत यावं. हे तुमचंही शहर आहे.कोणाच्या बापाची संपत्ती नाही".
त्या व्हायरल पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि प्रमुख शैक्षणिक-आयटी केंद्र म्हणून पुण्याची ख्याती आहे. पण तिथे सध्या 'पुणेकर विरुद्ध बाहेरून आलेले'असा नवा प्रादेशिक आणि भावनिक वाद चिघळताना दिसत आहे.सोशल मीडिया हे या शाब्दिक द्वंद्वाचे प्रमुख केंद्र बनले आहे. या वादाची झळ केवळ भाषिक गटांनाच नाही,तर मराठवाडा आणि विदर्भ या महाराष्ट्रातीलच प्रांतातून आलेल्या मराठी लोकांनाही बसत आहे. सोशल मीडियावरील काही पोस्टच्या माध्यमातून या लोकांना पुण्यात परत येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
नक्की वाचा >> 'मुंबई महापालिका एकत्र लढणार, पण ठाण्यात...' भाजपच्या बड्या नेत्यानं उडवली खळबळ
या लोकांचं पुण्यात स्वागत नसल्याचा संदेश देण्यात आला होता. या वाढत्या विरोधाला एका तरुणाने पोस्टरद्वारेच उत्तर दिले आहे.'@abhayanjuu' नावाच्या इन्स्टाग्राम युजरने शेअर केलेल्या एका फोटोत,"दिवाळीला जे पुणे सोडून जात आहेत,त्यांनी नक्की परत यावं.हे आपलं देखील शहर आहे. कोणाच्या बापाचे नाही,"असे लिहून बाहेरून आलेल्यांना पुण्यात परत येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पुणे शहर देशभरातून शिक्षण,रोजगार आणि व्यवसायासाठी येणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे.मात्र,कोणत्याही भागात 'स्थानिक विरुद्ध बाहेरील'हा वाद वाढणे शहराच्या एकात्मतेला आणि शांततेला बाधा ठरू शकते,अशी भीती व्यक्त होत आहे.
नक्की वाचा >> ...अन् प्रेमानंद महाराज ढसाढसा रडले, घडलंय तरी काय? व्हायरल Video मुळे भक्तांची चिंता वाढली