जाहिरात

Tamhini Thar Accident: श्रद्धांजलीही वाहू नका..ताम्हिणी घाटातील 6 जणांच्या मृत्यूवर मित्र थेटच बोलला,ऐका Video

Raigad Tamhini Ghat Accident: एका मित्राने व्हिडीओ पोस्ट करुन महत्त्वाची माहिती दिलीय. मुलांनी गाडी तसेच फ्लॅट कसा विकत घेतला, याची माहितीही तरुणाने दिलीय.

Tamhini Thar Accident: श्रद्धांजलीही वाहू नका..ताम्हिणी घाटातील 6 जणांच्या मृत्यूवर मित्र थेटच बोलला,ऐका Video
"Raigad Tamhini Ghat Accident: ताम्हिणीतील सहा जणांच्या मृत्यूवर मित्र थेटच बोलला, ऐका व्हिडीओ"
Rushikesh Girigosavi Instagram

Raigad Tamhini Ghat Accident: दिघी-पुणे महामार्गावरील ताम्हिणी घाटामध्ये थार जीप 500 फूट खोल दरीत कोसळून पुण्यातील सहा तरुणांचा मृत्यू झाला. सोमवारी (17 नोव्हेंबर 2025) रात्री घडलेल्या या दुर्घटनेची माहिती गुरुवारी (20 नोव्हेंबर) समोर आली. पुण्यातील कोपरे गावातील रहिवासी असणाऱ्या हे सहा तरुण कोकण पर्यटनासाठी निघाले होते. प्रवासादरम्यान एका अवघड वळणावर काळाने त्यांच्यावर घाला घातला. मुलांशी संपर्क होत नसल्याने भीतीपोटी पालकांनी पोलिसात धाव घेतली, यानंतर ड्रोनद्वारे राबवलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये त्यांच्या भीषण अपघाताची माहिती समोर आली. दुसरीकडे मृत्यू पावलेल्या सहा तरुणांसंदर्भात सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल होत आहेत. याचसंदर्भात त्यांच्या एका मित्राने व्हिडीओ पोस्ट करुन महत्त्वाची माहिती दिलीय आणि श्रद्धांजली वाहून नका अशी विनंती केलीय. mich_to_rushyaa नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवर व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. ऋषिकेश गिरीगोसावीने असं नेमके काय म्हटलंय, जाणून घेऊया...

'श्रद्धांजलीही वाहू नका...' असं का म्हणतोय मित्र | Raigad Tamhini Ghat Accident| Shraddhanjalihi Vahu Naka Friend Video 

नमस्कार मंडळी
मी ऋषी मी त्याच उत्तमनगर परिसरात राहतो, ज्या परिसरातील ती सहा मुलं होती, ज्यांची थार गाडी ही ताम्हिणी घाटात कोसळली आणि ते मृत्यूमुखी पावले. जो मालक होता साहिल बोटे ज्याला आम्ही बाबू म्हणायचो, चांगलाच मित्र होता, प्रथम होता त्याला आम्ही डोसा म्हणायचो ते आमचे चांगलेच मित्र होते. त्या मुलांनी स्वतःच्या कष्टावर ती गाडी घेतली होती कोणाकडून पैसे वगैरे घेऊन गाडी घेतली नव्हती. त्यांनी स्वतःचा फ्लॅटही घेतला होता, ती मुलं दारू पित नव्हती, ती पोरं नशेत नव्हती ती पोरं कधीच दारू पित नव्हती. सोशल मीडियावर काहीही टाकताय मनाला येईल... ते पैसेवाल्याचं पोरगं होतं... माज केला... हे केलं म्हणून ते झालं. तर ती माज करणारी पोरं नव्हती. तुम्ही एखाद्याच्या चेहऱ्यावरुन त्याचा अंदाज लावू शकत नाही. तुम्हाला काही माहिती नसेल तर कृपया करून काहीही बोलू नका. श्रद्धांजलीही वाहू नका, पण काहीही वाईट बोलू नका त्यांच्याबद्दल. कठीण काळ आहे सगळ्यांसाठीच, आमच्या मित्रांसाठी सर्वांसाठीच. 

मृत्यू पावलेल्या 6 जणांबाबत मित्र काय म्हणालाय, ऐका व्हिडीओ | Video | Frined Shared Video About Raigad Tamhini Ghat Accident

(नक्की वाचा: Tamhini Ghat Accident: नवी थार, 6 मित्रांची कोकण ट्रीप, ताम्हिणी घाटात शेवट... भीषण अपघाताची हृदयद्रावक स्टोरी)

त्या सहा मित्रांबाबत नेटकरी काय म्हणतायेत? | Social Media Users Comments On 6 Friends Died In Tamhini Ghat Accident

adeshparve नावाच्या युजरने म्हटलं की, "मानलं भाऊ तुला मित्र गेल्यावरही मित्राचं नाव जपत आहे खरंच मानलं तुला" 

dnyaneshmazire6969 कमेंट केलीय की, "ज्यांना सत्य परिस्थिती पाहायची असल त्यांनी इथे स्वतः या आणि खरी परिस्थिती पाहा, उगाच उंटावरून शेळ्या हाकू नका...लोकहो"

mi.rupesh यांनी लिहिलंय की, "यातल्या एकाला मी पर्सनली ओळखतो. आंबेगाव डीमार्टच्या येथे मोमोजचा व्यवसाय होता त्याचा आणि दारू काय तर साधं तंबाखू खाताना पण त्याला मी कधी बघितलेला नव्हतं उगाच तोंड दिलंय म्हणून काहीही बोलत जाऊ नका"

(नक्की वाचा: Tamhini Ghat Accident: कष्टाचे साम्राज्य.. घर, थार अन् घाटात घात! रायगड अपघाताची काळीज पिळवटणारी INSIDE स्टोरी)

rokade2879 या युजरने म्हटलंय की, "खरी मैत्री जपलीस भावा, माझ्या मित्रांचे जवळचे मित्र होते ते सगळे त्याने पण हेच सांगितल सगळं, खूप वाईट वाटलं ऐकून रे, कष्टाने उभं केलं होतं सगळं अन चांगले दिवस आले आणि असं झालं.."

Listen to the latest songs, only on JioSaavn.com