जाहिरात

Ambarnath News: 'भ्रष्टाचार-चोरी काही प्रमाणात झाली पाहिजे', अंबरनाथ पालिकेच्या उपनगराध्यक्षांचं खळबळजनक विधान

"भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झाली पाहिजे.पण परसेंटेज कमी असायला पाहिजे",असं खळबळजनक वक्तव्य अंबरनाथ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी केलं.

Ambarnath News: 'भ्रष्टाचार-चोरी काही प्रमाणात झाली पाहिजे', अंबरनाथ पालिकेच्या उपनगराध्यक्षांचं खळबळजनक विधान
Ambarnath Municipal Corporation General Assembly

Ambarnath Municipal Corporation News Today :  "भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झाली पाहिजे.पण परसेंटेज कमी असायला पाहिजे",असं खळबळजनक वक्तव्य अंबरनाथ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी केलं.अंबरनाथ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत डायसवर बसून पाटील यांनी हे वक्तव्य केलं. या विधानानंतर सदाशिव पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

सभागृहात नेमकं काय घडलं?

अंबरनाथ पालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती.या सभेत काही कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर चर्चा सुरू होती.या चर्चेदरम्यान उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झाली पाहिजे,पण परसेंटेज कमी असायला पाहिजे,असं वक्तव्य केलं.यावेळी बाजूला बसलेल्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी त्यांना थांबवण्याचाही प्रयत्न केला.मात्र 'खरं बोलायला कसली भीती?कोणी फाशी थोडीच देणार आहे',असं म्हणत पाटील यांनी आपल्या वक्तव्याचं समर्थन केलं.

नक्की वाचा >> Sambhajinagar Bus Accident: छावणी उड्डाणपुलावर बसचा भीषण अपघात, चालकाचा मृत्यू, MIDC चे 35 कामगार जखमी

सदाशिव पाटील यांनी पत्रकारांना केली दमदाटी

त्यानंतर सभागृहाच्या बाहेर येताच त्यांनी घुमजाव करत 'मी भ्रष्टाचार होऊ नये'असं म्हणालो होतो, अशी प्रतिक्रिया पाटील त्यांनी माध्यमांना दिली.परंतु, कॅमेरे बंद होताच त्यांचा सूर बदलला आणि पत्रकारांना दमदाटी करण्यास त्यांनी सुरुवात केली.दरम्यान,नगराध्यक्षा तेजश्री करंजुले आणि शिवसेना गटनेते रवींद्र करंजुले यांनी या वक्तव्याशी आपण सहमत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.त्यामुळे आता भ्रष्टाचाराचं समर्थन करून महायुतीची प्रतिमा मलिन करणारे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्यावर वरिष्ठ नेते काय कारवाई करतात?हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com