Mumbra Railway Accident: मुंब्रा स्थानकातील तो जीवघेणा 'टर्निंग पॉईट', 5 जणांच्या मृत्यूला ठरला कारणीभूत?

Mumbai Local Accident : मुंब्रा स्थानकात दोन्ही बाजूने अशी धोकादायक वळण आहेत. त्यामुळे असे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वेने सुरक्षेसंबंधित योग्य तो अभ्यास करुन उपाययोजना करणे गरजेचं असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे.  

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbra Railway Accident:  मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातात 5 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. दोन लोकल ट्रेनमधील प्रवाशांचा धावत्या ट्रेनमध्ये एकमेकांना धक्का लागल्याने काही प्रवाशी ट्रकवर पडून हा अपघात झाला. मात्र या अपघातानंतर मुंब्रा स्थानकाजवळील तो टर्निंग पॉईंट चर्चेत आला आहे. 

मुंब्रा स्थानकाजवळी फलाट क्रमांक 3 आणि 4 च्या ट्रॅकवरील टर्निंग पॉईंट आजच्या अपघातानंतर चर्चेत आला आहे. कारण स्थानकाजवळ येताना मोठं वळण याठिकाणी आहे. त्यामुळे दोन रेल्वे ज्यावेळी येथून विरुद्ध दिशेने जातात त्यावेळी त्यांच्यातील अंतर तुलनेने कमी होती. याशिवाय वळण असल्याने दरवाजात उभे असलेल्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागण्याचाही धोका असती, जे आज घडलं. 

(नक्की वाचा-  Mumbra Railway Accident : मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ मोठा अपघात, 5 जणांचा रेल्वेतून पडून मृत्यू)

मुंब्रा स्थानकात दोन्ही बाजूने अशी धोकादायक वळण आहेत. त्यामुळे असे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वेने सुरक्षेसंबंधित योग्य तो अभ्यास करुन उपाययोजना करणे गरजेचं असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे.  

बॅगेने घात केला?

मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9 ते 9.30 च्या दरम्यान कसारा ते सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधील प्रवासी फूटबोर्डवरुन प्रवास करीत होते. या लोकलमध्ये मोठी गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांना फूटबोर्डावरून लटकून प्रवास करावा लागतो.

Advertisement

(नक्की वाचा-  बॅगेने घात केला, कसारा-CSMT फास्ट लोकलमधून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू; दिवा-मुंब्रादरम्यान नेमकं काय घडलं?)

यादरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या लोकलमध्ये आणि कसारा-सीएसएमटी लोकलमधील प्रवाशाची बॅग खेचली गेली. तो प्रवासी खाली कोसळला, यामुळे आजूबाजूला लटकलेले प्रवासाही खेचले गेले. त्यातून आठ प्रवासी ट्रॅक पडल्याचं सांगितलं जात आहे. त्यातील एका प्रत्यक्षदर्शीने यासंदर्भातील माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार यातील पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.