जाहिरात

Mumbra Railway Accident : मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ मोठा अपघात, 5 जणांचा रेल्वेतून पडून मृत्यू

10 ते 12 प्रवासी ट्रॅकवर पडल्याची प्राथमिक माहिती आहे. अधिक प्रमाणात गर्दी असल्याने प्रवासी दरवाजावर लटकून प्रवास करत होते, त्यामुळे ही घटना घटल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 

Mumbra Railway Accident : मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ मोठा अपघात, 5 जणांचा रेल्वेतून पडून मृत्यू

रिझवान शेख, कल्याण

Mumbra Local Train Accident : मुंब्राहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या फास्ट लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी ट्रॅकवर पडल्याची घटना समोर आली आहे. 10 ते 12 प्रवासी ट्रॅकवर पडल्याची प्राथमिक माहिती आहे. अधिक प्रमाणात गर्दी असल्याने प्रवासी दरवाजावर लटकून प्रवास करत होते, त्यामुळे ही घटना घटल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 

घटनेनंतरचे काही व्हिडीओ समोर आले आहेत, त्यामध्ये दिसत आहे की काही प्रवाशी मुंब्रा रेल्वे प्लॅटफॉर्म आणि  रेल्वे ट्रॅकवर पडलेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 9 वाजेदरम्यान ही घटना घडली. धावत्या लोकलमधून पडल्याने पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. एका बॅगमुळे हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. 

दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली असून यामध्ये कसारा-सीएसएमटी लोकलमधून 8 प्रवासी पडल्याची माहिती आहे. यामध्ये 5 ते 6 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मध्य रेल्वेवर सकाळी 6 वाजेपासून ते सकाळी 11 वाजेपर्यंत नोकरदार वर्गाची मोठी गर्दी असते. अपुरी लोकल संख्या आणि कामावर वेळेत पोहोचण्यासाठी प्रवासी लटकून आणि गर्दीतून प्रवास करतात. 

कसा घडला अपघात? 

कसारा येथून सीएसएमटीच्या दिशेने जाणारी लोकल मुंब्र्याजवळ आली त्यावेळी बाजूने दुसरी लोकल वेगाने बाजून गेली. त्यावेळी लोकल ट्रेनमध्ये दरवाजात लटकलेले प्रवाशी एक्सप्रेसला घासले. यातून अनेकजण ट्रॅकवर पडून ही दुर्घटना घडली.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com