जाहिरात

Rain News: रायगडमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता, तर मुंबई,ठाणे, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट

रायगड प्रमाणे मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये ही जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Rain News: रायगडमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता, तर मुंबई,ठाणे, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट
मुंबई:

हवामान विभागाने रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात पुढील चोविस तासात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या ठिकाणी पुढील चोविस तासात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे सर्वांनाच खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. रविवारी रात्रभर पावसाने मुंबई आणि कोकणात चांगली बॅटींग केली. हवामान विभागाने पुढील काही दिवसांचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार सोमवारी कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. सोमवारी रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मंगळवारी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर बुधवार गुरूवारी पुन्हा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शुक्रवारी यलो अलर्ट रायगडमध्ये असेल. म्हणजे पुढच्या आठवड्यात कोकणात पावसाची दमदार हजेरी असणार आहे.  

ट्रेंडिंग बातमी - Navi Mumbai: धक्कादायक! लोकसंख्या 3 लाख, पण एकही पेट्रोलपंप नाही, घराघरात विकलं जातय पेट्रोल डिझेल

रायगड प्रमाणे मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये ही जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तिन्ही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर शुक्रवार पर्यंत काही दिवस मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या तिन्ही जिल्ह्यात वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हा आठवडा चांगल्या पावसाचा समजला जात आहे.त्यामुळे सर्वांनीच काळजी घेवून आणि पावसाचा अंदाज घेवूनच घरा बाहेर पडावे असे आवाहन केले जात आहे.  

ट्रेंडिंग बातमी - Beed News: “तुझा संतोष देशमुख करतो” म्हणत तरुणावर भररस्त्यात कोयत्याने हल्ला

हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, मुंबईत दिवसभर पाऊस सुरू राहणार आहे. तर, कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना कोणत्याही प्रकारचा अलर्ट दिलेला नसला तर या भागात पावसाचा जोर दिसून येईल, असं हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पुणे, सातारा व कोल्हापूरमधील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होवू शकतो. गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या नागपूर, विदर्भ परिसरात ही पावसाची शक्यता आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com