जाहिरात

Raj Thackeray : 'तुमच्यासारखा साचा देवाने बनवणं...' तेजस्विनी पंडितच्या राज ठाकरेंना खास शुभेच्छा

Raj Thackeray Birthday : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज (शनिवार, 14 जून) वाढदिवस आहे. मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं या निमित्तानं खास शुभेच्छा पोस्ट लिहिली आहे.

Raj Thackeray : 'तुमच्यासारखा साचा देवाने बनवणं...' तेजस्विनी पंडितच्या राज ठाकरेंना खास शुभेच्छा
Raj Thackeray Birthday : तेजस्विनी पंडितनं राज ठाकरेंना खास शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई:

Raj Thackeray Birthday : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज (शनिवार, 14 जून) वाढदिवस आहे. राज यांना मागील काही निवडणुकांमध्ये सातत्यानं मोठे पराभव सहन करावे लागले आहेत. पण, त्यांनंतरही फॅन्समध्ये त्यांची लोकप्रियता कायम आहे. 

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी राज्यभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी गर्दी करत असतात. मात्र यंदा राज यांनी तुम्ही वाढदिवशी शिवतीर्थावर येऊ नका..', असं आवाहन केलं होतं. सहकुटुंब मुंबईच्या बाहेर जात असल्यानं शिवतिर्थावर येऊ नका, असं आवाहन राज यांनी केलं होतं.

राज ठाकरे त्यांच्या निवासस्थानी वाढदिवसाच्या शुभेच्छा घ्यायला उपस्थित नाहीत. पण, तरीही अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री तेजस्विनी पंडितनंही (Tejaswini Pandit) खास पोस्ट करत राज ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. तेजस्विनीची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

( नक्की वाचा : 'महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल' दोन्ही ठाकरेंच्या युतीवर उद्धव यांचं मोठं वक्तव्य )

काय आहे पोस्ट?

तेजस्विनी पंडितनं या पोस्टमध्ये राज ठाकरे यांचं वर्णन मराठी अस्मितेचा पाठीराखा, मराठी भाषेचा पोषिंदा असं केलं आहे. त्याचबरोबर 'राजसाहेब खरंच, तुमच्यासारखा साचा देवाने बनवणं केंव्हाच सोडून दिलं !' अशी भावनाही तिनं व्यक्त केली आहे.

तेजस्विनी पंडित यांनी या पोस्टमध्ये म्हंटलंय,  'मराठी अस्मितेच्या पाठीराख्याला,  मराठी भाषेच्या पोषिंद्याला, महाराष्ट्राच्या भूमीपुत्राला आणि ह्या सगळ्या पलीकडे एका मनस्वी ,सच्च्या, अनोख्या व्यक्तिमत्वाला वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा ! 

राजसाहेब  खरंच, तुमच्यासारखा साचा देवाने बनवणं केंव्हाच सोडून दिलं ! देव तुम्हाला दीर्घायु देवो आणि तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो !
हसत रहा 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com