Raj Thackeray Interview : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत ही अनेकांची इच्छा आहे. ठाकरे बंधुनी एकत्र यावे अशी इच्छा अनेक नेत्यांनी याआधी बोलून दाखवली आहे. राज ठाकरे यांना पुन्हा एकदा यावर भाष्य केलं आहे. आमच्यातली भांडणे, वाद खूप छोटे आहेत. महाराष्ट्र खूप मोठा, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांना यावर सविस्तर भाष्य केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यावे हे अख्ख्या महाराष्ट्राचं स्वप्न आहे. यासाठी तुम्ही पुढे येणार का? महेश मांजरेकरांच्या या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे यांनी म्हटलं की, "महाराष्ट्र खूप मोठा आहे. कुठल्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद किरकोळ आहेत. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणे आणि हे वाद शुल्लक आहेत."
(नक्की वाचा- "मी राज ठाकरेंना भेटेन आणि विनंती करेन", हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर बावनकुळे काय म्हणाले?)
"एकत्र येणे आणि एकत्र राहाणे फार कठीण गोष्ट आहे, मला असं वाटत नाही. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. फक्त माझ्या इच्छेचा किंवा स्वार्थाचा विषय नाही. महाराष्ट्राचा स्वार्थ मी पाहतच आहे. मी तर म्हणतो सगळ्या महाराष्ट्रातील पक्षातील मराठी नेत्यांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा", असंही राज ठाकरे यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- नाशिकमधील हिंसाचार सुनियोजित, दंगेखोरांवर कडक कारवाई करणार : CM देवेंद्र फडणवीस)
शिंदेची शिवसेना टेकओव्हर करायला हरकत नव्हती, महेश मांजरेकरांनी विचारलेल्या या प्रश्नावर "मी आयत्या पीठावर रेघोट्या ओढत नाही" असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. "मुळात शिंदेचं बाहेर पडणे, शिंदे फुटणे हा वेगळ्या राजकारणाचा भाग झाला. मी शिवसेनेतून बाहेर पडलो त्यावेळी माझ्याकडेही आमदार खासदार आले होते ना. मलाही त्यावेळी काहीही शक्य होतं. पण माझ्या डोक्यात त्यावेळी एकच होते की, मी बाळासाहेबांशिवाय कुणाच्या हाताखाली काम करणार नाही. उद्धव सोबत मला काम करायला काहीही हरकत नव्हती. पण समोरच्याची इच्छा आहे का सोबत काम करावं?" असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.