जाहिरात

"मी राज ठाकरेंना भेटेन आणि विनंती करेन", हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर बावनकुळे काय म्हणाले?

Chandrashekhar Bawankule on National Education Policy : शासनाचे प्रयत्न आहेत की सर्व कामकाज मराठीतूनच व्हावे. काल मी चुकून हिंदीला राजभाषा म्हटले, मात्र हिंदी ही राजभाषा नाही, ती राष्ट्रभाषा आहे, अशी दुरुस्ती चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. 

"मी राज ठाकरेंना भेटेन आणि विनंती करेन", हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर बावनकुळे काय म्हणाले?

प्रविण मुधोळकर, नागपूर

Chandrashekhar Bawankule : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात हिंदी भाषेचाही समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली आहे. याला राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कडाडून विरोध केला आहे. मात्र राज ठाकरेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न भाजपने सुरु केला आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी सहकार्य करावं, यासाठी राज ठाकरेंना भेटून विनंती करणार असल्याचं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं की, राज साहेबांनी हा विषय समजून घ्यावा, ते समजूतदार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात एखाद्या भाषेचा समावेश झाला तर त्यात गैर काही नाही. मराठीचाही त्यात समावेश आहे. राज साहेबांनी पुढे येऊन हा विषय समजून घ्यावा. मी राज ठाकरेंना भेटेन आणि विनंती करेन. आम्ही सर्वजण मराठीला पुढे घेऊन जाऊ, पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात लागू करावी लागेल, असं आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं.

(नक्की वाचा-  नाशिकमधील हिंसाचार सुनियोजित, दंगेखोरांवर कडक कारवाई करणार : CM देवेंद्र फडणवीस)

मी चुकून हिंदीला राजभाषा म्हटले- बावनकुळे

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात हिंदी भाषेचाही समावेश आहे. महाराष्ट्राची मराठी ही अस्मितेची भाषा आहे. प्रत्येकाने मराठीत बोललेच पाहिजे, मराठी येणे आवश्यक आहे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. शासनाचे प्रयत्न आहेत की सर्व कामकाज मराठीतूनच व्हावे. काल मी चुकून हिंदीला राजभाषा म्हटले, मात्र हिंदी ही राजभाषा नाही, ती राष्ट्रभाषा आहे, अशी दुरुस्ती चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. 

(नक्की वाचा-  Anurag kashyap : "ब्राह्मणांवर मी...", अनुराग कश्यपची वादग्रस्त कमेंट)

हिंदी भाषा सर्वांनी शिकली पाहिजे- बावनकुळे

मराठीसाठी आमची भूमिका ठाम आहे.हिंदी हा विषय पाठ्यक्रमात आला असेल, तर त्यावरून आंदोलन करणे, लोकांना मारहाण करणे हे योग्य नाही. हिंदी भाषा सर्वांनी शिकली पाहिजे. देशात कुठेही गेलं तरी हिंदी बोलली जाते. सुमारे 60 टक्के राज्यांमध्ये प्रशासन हिंदीतून चालते. त्यामुळे इतर राज्यांची अस्मिता राखूनही हिंदी शिकण्यात काही गैर नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: