Raj-Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र यावेत अशी अनेकांची इच्छा आहे. राजकीय विचारधारा वेगळी असल्याने राजकारणात नाही मात्र एका कौटुंबिक कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.
राजकारण आणि वैयक्तिक आयुष्य वेगळं ठेवत ठाकरे कुटुंबिय एकत्र आले. राज आणि उद्धव ठाकरे यांची भाच्याच्या लग्नात भेट झाली आहे. यावेळी ठाकरे बंधुंनी एकमेकांशी संवाद देखील साधला. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे देखील उपस्थित होत्या.
काही दिवसांपूर्वी ठाकरे बंधुंची भेट हुकली
काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या मुलाच्या लग्नाला राज ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली होती. या सोहळ्यात रश्मी ठाकरे यांनी स्वत: राज ठाकरे यांचं स्वागत केलं होतं. उद्धव ठाकरे देखील या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. मात्र राज आणि उद्धव यांची भेट थोडक्यात हुकली होती.