Sharmila Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचा यंदाचा दसरा मेळावा खास आहे. ठाकरे बंधुंच्या मनोमिलनानंतर नवा उत्साह दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. घरापासून हाकेच्या अंतरावर असेल्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे कदाचित उपस्थित राहणार नाही. मात्र राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना शिवसैनिकांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं आहे.
शर्मिला ठाकरे यांनी दसरा मेळाव्याला आलेल्या शिवसैनिकांचे मिठाई वाटून तोंड गोड करत त्यांना खास शुभेच्छा दिल्या. दसऱ्याच्या निमित्ताने त्यांनी शिवसैनिकांना केवळ मिठाईच नाही, तर त्यासोबत 'सोनं' देऊन शुभेच्छा दिल्या.
पाहा VIDEO
शर्मिला ठाकरे यांनी शिवसैनिकांना मिठाई देऊन तोंड गोड केल्यामुळे आणि त्यांच्यासोबत संवाद साधल्यामुळे दसरा मेळाव्याला आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. दसरा मेळावा हा ठाकरे कुटुंबासाठी आणि शिवसैनिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या निमित्ताने शर्मिला ठाकरे यांनी शिवसैनिकांना खास भेटवस्तू देऊन त्यांचे प्रेम आणि उत्साह वाढवला.