जाहिरात

इंग्लंडच्या राणीने मेजवाणीला बोलवले, पण 'त्या'एका कारणासाठी रतन टाटांनी जाणे टाळले

एकदा लंडनच्या बकिंगहॅम राजवाड्यात त्यांचा सन्मान करण्यात येणार होता. मात्र त्यासाठी रतन टाटा गेले नव्हते. त्या मागचे कारण ही तेवढेच विचार करायला लावणारे आहे.

इंग्लंडच्या राणीने मेजवाणीला बोलवले, पण 'त्या'एका कारणासाठी रतन टाटांनी जाणे टाळले
मुंबई:

रतन टाटा हे नाव फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात अत्यंत आदराने घेतले जाते. टाटा सन्सचे चेअरमनपद भूषविलेल्या रतन टाटा यांनी उद्योगजगतात टाटा समूहाचा अभूतपूर्व ठसा उमटवला आहे. ज्या प्रमाणे ते उद्योजक म्हणून मोठे होते तसे ते एक व्यक्ती म्हणून ही खुप मोठे होते. उद्योग जगतापासून ते सर्व सामान्य माणसापर्यंत त्यांची नाळ जोडली गेली होती. त्यांच्या कर्तुत्वामुळे जगभरात त्यांना आदर सन्मान होता. त्यामुळेच एकदा लंडनच्या बकिंगहॅम राजवाड्यात त्यांचा सन्मान करण्यात येणार होता. मात्र त्यासाठी रतन टाटा गेले नव्हते. त्या मागचे कारण ही तेवढेच विचार करायला लावणारे आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रतन टाटांच्या कर्तुत्वाचा गौरव इंग्लंडच्या राणीने करायचा ठरवला होता. याचा खूप मोठा गौरव सोहळा लंडनमधल्या बकिंगहॅम राजवाड्यात होणार होता. पण अगदी ऐनवेळेला रतन टाटांनी हा कार्यक्रम रद्द केला. त्या मागचे कारण ऐकून तुम्ही थक्का व्हाल. रतन टाटा यांच्याकडे 'टँगो' आणि 'टिटो' हे दोन श्वान होते. त्या पैकी एक, खूप आजारी होता. अशा स्थितीत रतन टाटांनी एक मोठा निर्णय घेतला. 

Latest and Breaking News on NDTV

ट्रेंडिंग बातमी - 'श्रीमंत असून देखील...' राज ठाकरेंची रतन टाटांसाठी भावनीक पोस्ट

त्यावेळी रतन टाटांनी प्रिन्स चार्ल्स यांना फोन केला. घरी असलेल्या श्वानाची स्थिती त्यांना सांगितली. शिवाय अशा स्थितीत मी माझ्या श्वानांना सोडून येऊ शकत नाही असे त्यांना थेट कळवले. यावरून रतन टाटा यांच्या मनात एका प्राण्याबाबतही किती प्रेम आणि निष्ठा होती हे यातून दिसून येतं.  त्यांच्या श्वान प्रेमाची नेहमीच चर्चा होते. ताज हॉटेल समूहाच्या परिसरात किंवा 'बाँबे हाऊस'जे टाटा समूहाचं मुख्यालय आहे,  तिथे भटक्या श्वानांची ही काळजी घेतली जाते.

Latest and Breaking News on NDTV

ट्रेंडिंग बातमी - Ratan Tata demise : टाटांची 3800 कोटींची मालमत्ता कोणाला मिळणार? कोण होईल रतन टाटांचा उत्तराधिकारी?

रतन टाटा यांचे निधन झाले आहे. त्यामुळे देशावर शोककळा पसरली आहे. उद्योग जगताचेही मोठे नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्याच बरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी ही दुख: व्यक्त करत एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. दरम्यान रतन टाटा यांना भारतरत्न दिला जावा अशी मागणी राज्य सरकार केंद्राकडे करणार आहे.  

Previous Article
'श्रीमंत असून देखील...' राज ठाकरेंची रतन टाटांसाठी भावनीक पोस्ट
इंग्लंडच्या राणीने मेजवाणीला बोलवले, पण 'त्या'एका कारणासाठी रतन टाटांनी जाणे टाळले
businessman ratan tata death reason what did the doctor tell about his health and disease
Next Article
Ratan Tata: रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकसागरात, त्यांना नेमके काय झाले होते?