जाहिरात

Ready Reckoner Rate : बदलामुळे मुंबईतील मालमत्ता कर वाढला, सर्व मनपा क्षेत्रातील नागरिकांच्या खिशावर बोजा पडणार?

Mumbai Property Tax : मुंबई बाबत बोलायचे झाल्यास गेल्या 10 वर्षात मालमत्ता कर वाढवण्यात आलेला नाही. मात्र रेडी रेकनरचे दर बदलल्याने आता मालमत्ता कर आपोआप वाढणार आहे. 

Ready Reckoner Rate : बदलामुळे मुंबईतील मालमत्ता कर वाढला, सर्व मनपा क्षेत्रातील नागरिकांच्या खिशावर बोजा पडणार?

Property Tax : महाराष्ट्र सरकारने नुकताच रेडी रेकनर रेट (RRR) वाढीचा निर्णय घेतला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी शासनाने घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय होता. रेडी रेकनर रेट वाढल्याने त्याचा मालमत्ता करावरही परिणाम होणार आहे. रेडी रेकनरचे दर वाढल्याने महाराष्ट्रातील सगळ्या महापालिका क्षेत्रांत मालमत्ता कर वाढणार आहे. हा कर 8 ते 20 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मुंबई बाबत बोलायचे झाल्यास गेल्या 10 वर्षात मालमत्ता कर वाढवण्यात आलेला नाही. मात्र रेडी रेकनरचे दर बदलल्याने आता मालमत्ता कर आपोआप वाढणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या माहितीमध्ये मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी म्हटले की, मुंबईच्या सध्याच्या मालमत्ता कराच्या दरांमध्ये आतापर्यंत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. मालमत्ता कर हा मुंबई महापालिकेतर्फे आकारला जाणार अधिभार आहे. हे दर ठरवण्यामागील एक महत्त्वाचा भाग रेडी रेकनर दर असतात. हे दर म्हणजे एखाद्या मालमत्तेचे राज्य शासनाने ठरवलेले किमान मालमत्ता मूल्य असते. 

(नक्की वाचा- Property Tax : मुंबईकरांना मालमत्ता कर दरवाढीचा झटका; किती वाढीव कर भरावा लागणार?

गगराणी यांनी म्हटले की, मुंबई महापालिकेने कोणतीही दरवाढ केलेली नाही. मुंबईतील मालमत्ता कर हा थेट रेडी रेकनर दरांशी निगडीत असतो. रेडी रेकनर दरात वाढ झाल्याने मालमत्ता करातही वाढ झाली असून ही वाढ 8-20 टक्क्यांपर्यंत आहे. या करवाढीनंतर कोणाला किती कर बसतो याचा तपशील चालू आर्थिक वर्षातील बिलातूनच कळू शकणार आहे.

(नक्की वाचा-  Nashik Kumbhmela : नाशिक कुंभमेळ्यातील शाहीस्नानाच्या तारखांची 1 जूनला होणार घोषणा)

दहा वर्षांनंतर मालमत्ता करात वाढ

मुंबई महानगरपालिकेने 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच 2025-26 साठी मालमत्ता कराचे दर वाढवले ​​आहेत. मालमत्ता कर दरवाढीचा थेट परिणाम मुंबईतील 9 लाखांहून अधिक मालमत्ता मालकांवर झाला आहे. मुंबई महापालिकेने दावा केला की, मालमत्ता करात जास्तीत जास्त वाढ ही फक्त 15 टक्के आहे. परंतु अनेक भागात नागरिकांना 23 टक्के ते 40 टक्क्यांपर्यंत वाढीसह कर बिले मिळाली आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com