जाहिरात

Nashik Kumbhmela : नाशिक कुंभमेळ्यातील शाहीस्नानाच्या तारखांची 1 जूनला होणार घोषणा

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याचं ध्वजारोहण 31 ऑक्टोबर 2026 ला होणार आहे. जुलै ते सप्टेंबर दरम्यान दीड महिन्यात 3 प्रमुख शाही स्नान पार पडणार आहेत.

Nashik Kumbhmela : नाशिक कुंभमेळ्यातील शाहीस्नानाच्या तारखांची 1 जूनला होणार घोषणा

प्रांजल कुलकर्णी, नाशिक

Nashik News : प्रयागराजमधील महाकुंभनंतर पुढील कुंभमेळा नाशिकमध्ये गोदा काठी 2027 मध्ये आयोजित केला जाणार आहे. नाशिकमध्ये मागील कुंभमेळा 2015 मध्ये जुलै ते सप्टेंबर दरम्यान येथे भरला होता. आगामी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यातील शाहीस्नान तारखांची घोषणा 1 जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडणार आहे.  शैव आणि वैष्णव यांच्या 13 आखाड्याच्या प्रमुखांना या बैठकीला निमंत्रण देण्यात आलं आहे.  

सिंहस्थ कुंभमेळ्याचं ध्वजारोहण 31 ऑक्टोबर 2026 ला होणार आहे. जुलै ते सप्टेंबर दरम्यान दीड महिन्यात 3 प्रमुख शाही स्नान पार पडणार आहेत. 3 शाही स्नानासोबतच कुंभमेळ्याच्या 18 महिन्यांच्या कालावधीत 42 पर्व स्नान पार पडणार आहेत. 

(नक्की वाचा-  Property Tax : मुंबईकरांना मालमत्ता कर दरवाढीचा झटका; किती वाढीव कर भरावा लागणार?)

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्राधिकरण आणि अन्य समित्यांमध्ये साधू महंतांना देखील स्थान द्यावे, साधूंना कायमस्वरूपी जागा द्यावी अशी साधू महंतांची मागणी आहे. तसेच कुंभमेळ्याच्या कामांवर साधू महंतांची नाराजी देखील व्यक्त केली आहे. 

(नक्की वाचा- - ऑपरेशन लग्नकार्य! हुंडा घेणारा कळवा 5000 मिळवा, 'या' राजकीय पक्षाचा भन्नाट उपक्रम)

सिंहस्थ प्राधिकरण आणि साधू-महंताना नाशिक किंवा त्र्यंबकेश्वर कायमस्वरुपी जमीन या विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं वैष्णव आखाड्याचे प्रवक्ते भक्तीचरणदास महाराज यांनी म्हटलं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com