BMC Election : मुंबईत अमराठी नगरसेवकांची संख्या वाढली; सर्वाधिक भाजपचे, गुजराती किती?

BMC Non marathi Corporators: भाजपकडून निवडून आलेल्यांमध्ये गुजराती, उत्तर भारतीय आणि सिंधी-पंजाबी तसेच दक्षिण भारतीय समाजातील प्रतिनिधींचा समावेश आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

BMC Non marathi Corporators: मुंबई महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत 'मराठी माणूस' आणि 'मराठी अस्मिता' हे मुद्दे केंद्रस्थानी होती. निकालांनंतर मात्र वेगळीच बाब समोर आली आहे. मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 80 अमराठी नगरसेवक निवडून आले आहेत. 

भाजपच्या एकूण नगरसेवकांपैकी 54 नगरसेवक मराठी असले, तरी अमराठी नगरसेवकांच्या संख्येतही भाजपनेच आघाडी घेतली आहे. भाजपकडील अमराठी नगरसेकांमध्ये गुजरातील नगरसेवकांचा आकडा देखील मोठा आहे. मुंबई महापालिकेत आता 80 अमराठी प्रतिनिधी आहेत, जे महानगरपालिकेच्या इतिहासातील सर्वाधिक संख्या आहे. 2017 मध्ये, निवडून आलेल्या 72 बिगर-मराठी नगरसेवकांपैकी 36 भाजपचे होते.

भाजपकडून निवडून आलेल्यांमध्ये गुजराती, उत्तर भारतीय आणि सिंधी-पंजाबी तसेच दक्षिण भारतीय समाजातील प्रतिनिधींचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विजयावर भाष्य करताना म्हटले की, "भाजप विभाजनाच्या नव्हे तर सर्वसमावेशक राजकारणावर विश्वास ठेवते."

(नक्की वाचा-  Mumbai News: मुंबईत उभारले जाणार 30 मजली 'बिहार भवन'; जागा आणि बजेटही ठरले)

भाजपकडील अमराठी नगरसेवक

गुजराती- 14
उत्तर भारतीय - 10 
राजस्थानी- 6
सिंधी-पंजाबी- 2
साऊथ इंडियन-  3

(नक्की वाचा-  Mumbai News: मुंबईकरांनो काही दिवस पाणी उकळून प्या आणि जपून वापरा! BMC चं नागरिकांना आवाहन)

कोणत्या पक्षाचे किती अमराठी नगरसेवक?

भाजपशिवाय काँग्रेसने 18, MIM 8, शिवसेना (UBT) 6, शिवसेना (शिंदे गट) 3, राष्ट्रवादी (NCP) 3, समाजवादी पक्ष 2 तर मनसेचा एक अमराठी नगरसेवक निवडून आला आहे.  मराठी अस्मितेच्या मोहिमेला न जुमानता मराठी मतदारांनीही भाजपला मोठ्या प्रमाणात पसंती दिल्याचे दिसते.
 

Advertisement